मुंबई : येथील गरवारे क्लब हाऊसमध्ये फिफा विश्चचषकाचा अंतिम सामना बघायला आलेल्या 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. हृद्यांश अवनिश राठोड असं या मुलाचं नाव आहे. सदर प्रकरणात पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
याबाबतची अधिक माहिती अशी, काल (१८ डिसेंबर) गरवारे क्लब हाऊसच्या सहाव्या माळ्यावर गरवारे क्लबच्या सदस्यांकरता फिफा विश्चचषकाच्या अंतिम सामन्याच्या थेट प्रक्षेपणाचं आयोजन करण्यातं आलं होतं. यावेळी क्लबचे सदस्य अवनिश राठोड हे पत्नी आणि मुलगा हृद्यांशसह तिथं आले होते.
रात्री पाऊणे अकराच्या सुमारास हृद्यांश दुसऱ्या एका मुलासह सहाव्या माळ्यावरून पाचव्या माळ्यावर बाथरूम करिता गेला होता. तो पाचव्या माळ्यावरून पुन्हा सहाळ्या माळ्यावर येत असताना खाली पडला. त्यामुळे त्यास तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इथं त्याच्यावर उपचार सुरु असताना मध्यरात्री ०२:०० वाजता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केलं.
संबंधित घटनेनंतर पोलिसांनी यांनी रुग्णालयात जाऊन अवनिश राठोड यांचा जबाब नोंद केला. तसंच दोन पांचांसमक्ष इंक्वेस्ट पंचनामा करण्यात आला आणि मुलाचा मृतदेह पोस्टमोर्टेमसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर कॉज ऑफ डेथ प्राप्त झाल्यानंतर मृतदेह अंत्यविधीला पालकांचे ताब्यात देण्यात आला. सदर प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ३२/२२ कलम १७४ अन्वये नोंद घेण्यात आली.
ADVERTISEMENT