बीडच्या रजिस्ट्री कार्यालयाबाहेर गोळीबार; दोन तरुण जखमी

मुंबई तक

• 09:14 AM • 25 Feb 2022

–रोहिदास हातागळे, बीड जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या बीड शहरात आज भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे लोकांची नेहमी वर्दळ असणाऱ्या रजिस्ट्री कार्यालयाबाहेरच हा प्रकार घडला असून, शहरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (25 फेब्रुवारी) सकाळी घडलेल्या या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. भरदिवसा सार्वजनिक कार्यालयाच्या आवारातच गोळीबारसारखा गंभीर प्रकार घडल्याने बीड शहरातील […]

Mumbaitak
follow google news

रोहिदास हातागळे, बीड

हे वाचलं का?

जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या बीड शहरात आज भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे लोकांची नेहमी वर्दळ असणाऱ्या रजिस्ट्री कार्यालयाबाहेरच हा प्रकार घडला असून, शहरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (25 फेब्रुवारी) सकाळी घडलेल्या या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.

भरदिवसा सार्वजनिक कार्यालयाच्या आवारातच गोळीबारसारखा गंभीर प्रकार घडल्याने बीड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. या गोळीबारात सतीश बबन क्षीरसागर (वय 30, रा. लक्ष्मणनगर, बीड) आणि फारूक सिद्दीकी (वय 28, रा. जालना रोड, बीड) अशी जखमींची नावे आहेत.

जखमी तरुण आज (25 फेब्रुवारी) रोजी सकाळी शहरातील मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला. यात दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, घटनेनं पोलीस दलात आणि शहरात खळबळ उडाली आहे.

शेतीच्या वादातून बीड शहरातील रजिस्ट्री कार्यालय परिसरामध्ये आज भरदिवसा गोळीबार झाल्याची ही धक्कादायक घटना घडली असून, पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपासात जे समोर येईल त्यानुसार कारवाई करणार असल्याचं पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीड शहरातील आकाशवाणी परिसरात क्षीरसागर बंधूंची जमीन आहे. या जमिनीवरून आमदार संदिप क्षीरसागर कुटुंबीय आणि काका भारतभूषण क्षीरसागर कुटुंबियामध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत.

या वादाचे पर्यावसान शुक्रवारी गोळीबारात झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. आमदार क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर आणि बंधू नगर परिषद उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर हे आपल्या काही लोकांसह रजिस्ट्री कार्यालयात असताना सतीश पवार काही कार्यकर्त्यांना घेऊन तेथे आले. या ठिकाणी दोन गटात बाचाबाची झाली अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

    follow whatsapp