कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरच्या निकटवर्तीयाचा ठाण्यातला फ्लॅट ईडीने सील केला आहे. या फ्लॅटची किंमत ५५ लाख रूपये आहे. मुमताज एझाज शेख ही इक्बाल कासकरची जवळचे संबंध असलेली महिला होती. PMPLA अंतर्गत आणि खंडणीच्या प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणीची तक्रार २०१७ मध्ये ठाणे पोलिसांनी दाखल करून घेतली होती.
ADVERTISEMENT
पोलिसांच्या 2017 च्या FIR नुसार ही कारवाई केली आहे. ईडीने दाऊद आणि त्याच्या मुंब्र्यातील साथीदारांविरोधात तपास सुरू केला तेव्हा इक्बाल कासकर फेनरूरीमध्ये होता. त्यानंतर ईडीने त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणात त्याची चौकशी करण्यात आली. मुमताज शेख आणि इसरार सय्यद यांच्या निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली.
तपास केल्यानंतर, दिनांक 13.11.2017 रोजी आयपीसीच्या कलम 173 अन्वये अंतिम अहवाल कासारवडवली पोलीस स्टेशन, ठाणे यांनी कलम 3(i)(ii), 3(2), 3(4) आणि 3(5) नुसार दाखल केला. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, 1999 आयपीसीच्या कलम 384, 386, 387, 34 आणि 120B ही कलमं लावण्यात आली.
ईडीच्या चौकशीत ही बाबही पुढे आली की सुरेश मेहता नवाचा एक रिअल इस्टेट बिल्डर आणि डेव्हलपर त्यांच्या भागीदारासह मेसर्स दर्शन एंटरप्राईझेसद्वारे बांधकाम व्यवसाय करत होते. त्यांना दाऊदच्या नावाची धमकी देऊन इक्बाल कासकर, मुमताज शेख आणि इसरार अली या तिघांनी एक फ्लॅट बळकावला. त्याशिवाय १० लाख रूपयांचे चार चेकही त्याच्याकडून या तिघांनी उकळले. या चेकद्वारे तिघांनी पैसे काढले होते.
ही खाती फक्त 10 लाखांची रोख रक्कम काढण्यासाठी चालवली जात होती आणि या खात्यांमध्ये इतर कोणतेही व्यवहार केले जात नव्हते. ही वापरकर्त्यांना लुटण्यासाठी चालवली गेली. या कालावधीत आरोपींनी सुरेश देवीचंद मेहता यांच्याकडून रोख रक्कम उकळल्याचेही उघड झाले आहे.
ADVERTISEMENT