गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर नारायण राणेंना झालेली अटक यावरुन चांगलचं राजकारण सुरु आहे. राणे विरुद्ध शिवसेना वादात राज्याचं राजकारण तापलेलं असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि राणेंना एकमेकांवर आरोप करण्याऐवजी राज्याच्या विकासाकडे लक्ष द्या असा सल्ला दिला आहे. ते कल्याणध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
ADVERTISEMENT
काय म्हणाले रामदास आठवले?
राज्याच्या राजकारणात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीने महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केलेली आहे. पण गेले अनेक वर्षे शिवसेना भाजप एकत्र राहिली आहे. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला असं वाटत की शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुती सरकार पुन्हा येऊ शकते. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. एकत्र बसून पुन्हा काही मार्ग काढता येतो का त्यावर चर्चा होऊ शकते.
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे. अशा पध्दतीचे वाद आपल्याला चालणार नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. केंद्र आणि राज्यमार्फत..हा वाद मिटला पाहिजे. आपल्याविरुद्ध बोलले म्हणून सत्तेचा अशा पद्धतीने वापर करुन राणेंवर कारवाई करणं योग्य नाही असंही रामदास आठवलेंनी यावेळी सांगितलं.
नारायण राणेंची भाषा ही शिवसेनेचीच भाषा आहे. त्यांचं आयुष्य एकत्र गेलंय, त्यामुळे राणेंच्या वक्तव्याला गंभीरपणे घेण्याची गरज नव्हती. दोघांनीही आरोप-प्रत्यारोप न करता विकासाकडे लक्ष द्यावं असंही आठवलेंनी यावेळी सांगितलं.
कोरोना आहे काळजी घ्या म्हणतात अन् मंत्र्यांना यात्रा काढायला सांगतात -अजित पवार
ADVERTISEMENT