मोदी सरकारने SOP ठरवण्यासाठी सात दिवस लावल्याने विदेशातली मदत लांबली, ऑक्सिजन तुटवडा वाढला

मुंबई तक

• 10:04 AM • 04 May 2021

भारतात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गहिरं होत चाललं आहे. अशात ऑक्सिजन तुटवडा, लसींचा तुटवडा आणि रेमडेसिवीरचा तुटवडा देशभरात भासतो आहे. अशात भारताची मदत करण्यासाठी जगभरातले जवळपास 40 देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताची मदत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सिंगापूरहून कोरोना काळासाठीची मदत 25 एप्रिललाच भारतात आली आहे. ज्यामध्ये ऑक्सिजन जनरेटर्स, कन्सट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स यांचा समावेश आहे. मात्र […]

Mumbaitak
follow google news

भारतात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गहिरं होत चाललं आहे. अशात ऑक्सिजन तुटवडा, लसींचा तुटवडा आणि रेमडेसिवीरचा तुटवडा देशभरात भासतो आहे. अशात भारताची मदत करण्यासाठी जगभरातले जवळपास 40 देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताची मदत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सिंगापूरहून कोरोना काळासाठीची मदत 25 एप्रिललाच भारतात आली आहे. ज्यामध्ये ऑक्सिजन जनरेटर्स, कन्सट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स यांचा समावेश आहे. मात्र याबाबतची नियमवाली ठरवण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला सात दिवसांचा अवधी लागला. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढता आली नाही अशी माहिती आता समोर आली आहे.

हे वाचलं का?

मोदी सरकारच्या सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2 मे रोजी विदेशातून भारतात आलेल्या मदतीचे SOP आणि ते राज्यांना वाटण्याची प्रक्रिया सुरू केली. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या उशिराच्या प्रतिसादामुळे देशभरात सात दिवस तुटवडा भासला ही बाब आता समोर आली आहे.

    follow whatsapp