Pervez Musharraf Death : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष (Pakistan Ex-President) जनरल परवेझ मुशर्रफ (Genral Pervez Musharraf Die) यांचे रविवारी निधन झाले. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली. संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते अमायलोइडोसिस या आजाराने ग्रस्त होते. It was in such a state in the last days
ADVERTISEMENT
‘भारत-पाकिस्तान राजकारणात कलाकार बळी ठरताहेत’, माहिरा खान संतापली
शेवटच्या दिवसात अशा अवस्थेत होते
परवेझ मुशर्रफ यांच्या समोर आलेल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये त्यांना चालता येत नसल्याचे दिसून आले होते. ते पूर्णपणे व्हील चेअरवर अवलंबून होते आणि अन्नही खाऊ शकत नव्हते एमायलोइडोसिसच्या तक्रारीनंतर मुशर्रफ यांना गेल्या वर्षी 10 जून रोजी संयुक्त अरब अमिरातीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे हळूहळू बहु-अवयव निकामी झाले होते. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रदीर्घ आजाराने आज त्यांचे निधन झाले.
फवाद हुसैन यांनी ट्विट केलं
इम्रान खान सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या फवाद हुसैन यांनी ट्विट करून माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची आठवण काढली. त्यांनी लिहिले, परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले, ते एक महान व्यक्ती होते.
दिल्लीत झाला होता जन्म
परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला. 1947 मध्ये त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. फाळणीच्या काही दिवस आधी त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात पोहोचले होते. त्यांचे वडील सईद पाकिस्तानच्या नव्या सरकारसाठी काम करू लागले आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित होते.
तुर्कीमध्ये घालवला बराच काळ
यानंतर त्यांच्या वडिलांची पाकिस्तानातून तुर्कीला बदली झाली. 1949 मध्ये ते तुर्कीला गेले. काही काळ ते आपल्या कुटुंबासह तुर्कीमध्ये राहत होते, तर त्यांनी तुर्की भाषा देखील शिकली. मुशर्रफ हे तरुणपणी खेळाडू राहिले आहेत. 1957 मध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब पुन्हा पाकिस्तानात परतले. त्यांचे शालेय शिक्षण कराचीच्या सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये झाले आणि कॉलेजचे शिक्षण लाहोरच्या फोरमन ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले.
मुशर्रफना सुनावण्यात आली होती फाशीची शिक्षा
परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावलेली व्यक्ती आहेत. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने अशी शिक्षा सुनावली आहे.
परवेझ मुशर्रफ यांच्यावर 3 नोव्हेंबर 2007 रोजी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर 2007 च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याबद्दल डिसेंबर 2013 देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 31 मार्च 2014 रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते. 79 वर्षीय मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत होते.
ADVERTISEMENT