माजी पंतप्रधान मनमोहन सिंग दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल

मुंबई तक

• 02:50 PM • 13 Oct 2021

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यामुळे आज डॉक्टरांच्या सल्ल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग यांना यावर्षी कोरोनाची लागण झाली होती. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल कऱण्यात आलं होतं. 19 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत […]

Mumbaitak
follow google news

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यामुळे आज डॉक्टरांच्या सल्ल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग यांना यावर्षी कोरोनाची लागण झाली होती. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल कऱण्यात आलं होतं. 19 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

हे वाचलं का?

मनमोहन सिंग 88 वर्षांचे आहेत. त्यांना मधुमेह देखील आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत. 1990 मध्ये पहिली शस्त्रक्रिया तर 2009 मध्ये दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या वर्षीही एका नवीन औषधामुळे त्यांना रिअॅक्शन आली होती तसंच तापही आला होता. ज्यानंतर मनमोहन सिंग यांना एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग हे राज्यसभा सदस्य आहेत. तसंच 2004 ते 2014 या दहा वर्षांच्या कालावधीत ते पंतप्रधान होते.

काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी मोदी सरकारला एक पत्र लिहून पाच महत्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यामध्ये लसीकरणामध्ये पारदर्शकता आणत येत्या सहा महिन्याचा रोडमॅप तयार करण्याची सूचना केली होती. डॉ. मनमोहन सिंह यांच्या पत्राला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राजकीय उत्तर दिलं असलं तरी त्यांच्या सूचना या बऱ्यापैकी स्वीकारल्याचं दिसून आलं आहे.

    follow whatsapp