देशात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय. अशातच गोव्यात देखील दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र आहे. या परिस्थिती गोवा सरकारने राज्यातील कोरोना संसर्गावर उपचार देणाऱ्या सर्व 21 खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांची जबाबदारी घेण्याची घोषणा केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्वीट ककत राज्यातील खासगी रुग्णालयात मोफत उपचार केले जातील असं म्हटलंय.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री सावंत त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “गोव्यातील जनतेच्या हितासाठी, कोव्हिड रूग्णांच्या उपचारांसाठी राज्य सरकार खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवेल. सरकार यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयात अधिकाऱ्यांची नेमणूक करेल तसंच दीनदयाल स्वास्थ्य सेवा योजनेतील लाभार्थ्यांना 100% मोफत उपचार सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.”
देशातील सर्वात लहान गोवा राज्यात कोरोनामुळे स्थिती खालावत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रूग्ण राज्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन नसल्यामुळे लोकांचा मृत्यू होतोय. नुकतंच गोव्यातील मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी 13 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
दरम्यान गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे कोणत्याही रूग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT