कोरिओग्राफर गणेश आचार्यवर लैंगिक छळाचा आरोप, पोलिसांनी दाखल केली चार्जशीट

मुंबई तक

• 11:27 AM • 01 Apr 2022

सुप्रसिद्ध गणेश आचार्यवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक छळ, पाठलाग आणि मारहाणीच्या आरोपाखाली गणेश आचार्यच्या विरोधात ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. गणेश आचार्यवर २०२० मध्ये त्याच्या एका को डान्सरने आरोप केले होते. या प्रकरणी हे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केलं आहे. या प्रकरणी ओशिवारा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांनी महानगर दंडाधिकारी […]

Mumbaitak
follow google news

सुप्रसिद्ध गणेश आचार्यवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक छळ, पाठलाग आणि मारहाणीच्या आरोपाखाली गणेश आचार्यच्या विरोधात ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. गणेश आचार्यवर २०२० मध्ये त्याच्या एका को डान्सरने आरोप केले होते. या प्रकरणी हे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केलं आहे. या प्रकरणी ओशिवारा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात नुकतंच आरोपपत्र दाखल केलं आहे अशी माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

बॉलिवूडमध्ये कायमच आपल्या हटके स्टाईलच्या कोरिओग्राफीमुळे गणेश आचार्य हा कायमच चर्चेत असतो. अनेक गाण्याचं नृत्य दिग्दर्शन त्याने केलं आहे. अशात बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याचा बदल्यात लैंगिक छळ केल्याचा आरोप एका पीडितेने गणेश आचार्यवर केला आहे. बॉलिवूडमध्ये #Metoo ही मोहीमही गाजली होती. त्यावेळीही गणेश आचार्यवर काही आरोप लागले होते. आता पुन्हा एकदा गणेश आचार्यच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

आरोप केलेली पीडिता ही त्याची कोरिओग्राफर सहकारी असून तिनं याप्रकरणी 2020 मध्ये केलेल्या तक्रारीमध्ये सांगितलं होतं की, ती गणेशच्या ऑफिसमध्ये कामासाठी जात असे. त्यावेळी त्यानं तिच्यावर काही शाररिक टिप्पणी केल्या होत्या. केवळ शेरेबाजीच नाहीतर अश्लील व्हिडिओ दाखवले जात होते. त्यानं केलेल्या मागणीला धुडकावल्यानंतर त्यानं मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली होती. एवढेच नाहीतर सहा महिन्यानंतर भारतीय फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोशिएशननं तिची सदस्यता रद्द केली होती.

पोलीस अधिकारी संदीप शिंदे यानं मुंबईतल्या अंधेरीमध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयात चार्जशिट दाखल केली. गणेश आचार्यसह त्याच्या असिस्टंटविरोधात आयपीसी कलम ३५४ – अ (लैंगिक छळ), कलम ३५४-सी, कलम ३५४-डी (पाठलाग), ५०९ (महिलेचा अपमान करणे), कलम ३२३ (दुखापत करणे), ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतुपुरस्सर अपमान), कलम ५०६ (धमकी देणे) आणि कलम ३४ (गुन्हा करण्याचा हेतू) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

गणेश आचार्यवर आरोप करणाऱ्या महिलेने सांगितलं की जेव्हा गणेश आचार्यसोबत लैंगिक संबंध नाकारले तेव्हा त्याने माझा छळ केला. अश्लील कमेंट करणार, अश्लील चित्रपट दाखवत त्याने माझा विनयभंगही केला असंही या पीडित महिलेने सांगितलं आहे. यशस्वी व्हायचं असेल तर तुला माझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवावे लागतील. मी नकार दिल्यानंतर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनने सहा महिन्यांनी माझ सदस्यत्व रद्द केलं. गणेश आचार्यने मला २०१९ मध्ये शिवीगाळ आणि मारहाणही केली होती असंही पीडितेनं म्हटलं आहे.

    follow whatsapp