ADVERTISEMENT
कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी,
आनंद शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातुनी
केवडा, दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे गणेश चतुर्थीचा दिस आज!
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!
देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..! सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
डोळे कितीही झाकले,
तरी गुल्लाल हा उडणारच..
आणि कितीही दंड ठेवला,
तरी DJ हा वाजणारच..
कारण बाप्पा येतोय माझा…
गणपती बाप्पा मोरया!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
ADVERTISEMENT