ADVERTISEMENT
राज्यभरात आज गणपती बाप्पांना आज वाजत-गाजत भावपूर्ण पद्धतीने निरोप देण्यात आला.
शहरात आज विविध ठिकाणी समुद्रकिनाऱ्यांवर आणि इतर ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते.
कोविडचे सर्व नियम पाळून सोशल डिस्टन्सिंगचं भान राखून यंदा भाविकांनी बाप्पाला निरोप दिला.
यंदाचाही गणेशोत्सव कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला, त्यामुळे भविष्यकाळात तुझं स्वागत कोरोनामुक्त वातावरणात करण्याची संधी मिळू दे अशी मागणी यावेळी भक्तांनी केली.
बाप्पानेही आपल्या भक्तांकडून पाहुणचार घेत त्यांचा निरोप घेतला.
पुढच्या वर्षी लवकर येईन असं सांगून बाप्पाने आपल्या घरी प्रवासाला सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT