शेतकऱ्यांचा गणपती, ७ किलो सोयाबीनपासून साकारला बाप्पा

मुंबई तक

• 03:23 PM • 12 Sep 2021

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. अशावेळी वाशिम येथील शेतकऱ्याने तयार केलेल्या गणपतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जय भवनी-जय शिवाजी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा सोयाबीनच्या दाण्यांपासून गणेशाची मूर्ती तयार केली आहे. ७ किलो सोयाबीन आणि १६ दिवसांच्या मेहनतीनंतर हा गणपती तयार झाला आहे. ७ शेतकऱ्यांनी आपल्या घरातून १-१ किलो सोयाबीन […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. अशावेळी वाशिम येथील शेतकऱ्याने तयार केलेल्या गणपतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जय भवनी-जय शिवाजी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा सोयाबीनच्या दाण्यांपासून गणेशाची मूर्ती तयार केली आहे.

७ किलो सोयाबीन आणि १६ दिवसांच्या मेहनतीनंतर हा गणपती तयार झाला आहे. ७ शेतकऱ्यांनी आपल्या घरातून १-१ किलो सोयाबीन देत ही मूर्ती तयार केली आहे.

हा गणपती सध्या वाशिममध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवर या मंडळाने बारकाईने काम करुन ही मूर्ती तयार केली आहे.

३०-३५ किलो वजनाची ही मूर्ती १ हजारापेक्षा कमी रुपयांत तयार झाली आहे.

    follow whatsapp