भंडारा जिल्ह्यात एका ३५ वर्षीय महिलेवर मदत करण्याच्या बहाण्याने सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे प्रकरण भंडारा पोलिसांकडून गुन्हा गोंदिया पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे. मदतीचं आश्वासन देऊन या महिलेवर बलात्कार करण्यात आला. तीन नराधमांनी या महिलेला दोन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या महिलेला नदीकाठी फेकलं. महिलेवर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
पतीपासून विभक्त झालेल्या महिलेवर दोन नराधमांचा बलात्कार; गरोदर राहिल्याचं समजताच…
गोंदियामध्ये नेमकी काय घडली बलात्काराची घटना?
पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. गोंदिया या ठिकाणी तिच्या बहिणीकडे आली होती. ३० जुलैला बहिणीसोबत तिचं भांडण झालं. त्यानंतर तिने रात्रीच्या सुमाराला बहिणीचं घर सोडलं.ती गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात असलेल्या कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्यासाठी निघाली. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपींनी घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला कारमध्ये बसवलं. मात्र तिला त्यांनी घरी सोडलं नाही. गोंदियातील मुंडीपार जंगलात नेऊन या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ३१ जुलैलाही तिला पळसगाव जंगलात नेण्यात आलं आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
या धक्कादायक घटनेनंतर पीडित महिला जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यात असलेल्या धर्मा ढाब्यावर पोहचली. तिथे दुचाकी दुरूस्त करणाऱ्या आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानेही घरी सोडण्याच्या बहाण्याने या महिलेवर पाशवी बलात्कार केला. आरोपीने त्याच्या एका मित्रालाही सोबत घेतलं होतं. या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. तसंच या महिलेला मोह गावाच्या पुलाजवळ विविस्त्र अवस्थेत सोडून दिलं.
डोंबिवलीतल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला २० वर्षांचा कारावास
पहाटेच्या सुमारास पीडितेला गावकऱ्यांनी पाहिलं. विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात ही महिला विव्हळत होती. काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय आल्याने गावकऱ्यांनी तातडीने कारधा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी भंडारा सामान्य रूग्णालयात तिला दाखल केलं. वैद्यकीय तपासणीत महिलेवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी फरार झाला आहे.
भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत कनहाडमोह गावाजवळ झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची अवस्था गंभीर झाली आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. तसंच तिच्यावर आणखी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. ३० जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत या महिलेवर वेगवेगळ्या आऱोपींनी सामूहिक बलात्कार केला. एबीपी माझाने यासंदर्भातले वृत्त दिलं आहे.
पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे प्राथमिक उपचार केंद्र भंडारा या ठिकाणाहून तिला नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं आहे. पीडिताने सांगितल्यानुसार भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर तिसरा आरोपी फरार आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT