ADVERTISEMENT
हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे अदाणी समुहाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर अदाणी समूहाच्या मालमत्तेमध्ये मोठी घट झाली होती.
त्यानंतर आता या धक्क्यातून गौतम अदाणी सावरण्यास सुरुवात झाली आहे.
अदाणी यांच्या शेअर्समध्ये मागील दोन दिवसांपासून मोठी उसळी पाहायला मिळतं आहे. बुधवारी त्यांच्या ५ शेअर्संना अप्पर सर्किट लागलं.
शेअर्सच्या किंमती वाढल्याचा थेट परिणाम त्यांच्या संपत्तीवर आणि नेटवर्थवर दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी अब्जाधीशांच्या यादीत ३४ व्या स्थानावर राहिलेल्या अदाणी यांनी मोठी उसळी घेतली आहे.
गौतम अदाणी आता अब्जाधीशांच्या यादीत ३० व्या नंबरवर पोहचले आहेत.
ADVERTISEMENT