Satara Crime : सातारा जिल्ह्यातील साखरवाडीत अल्पवयीन (Minor Girl) मुलीच्या पतीवर (POCSO) पोक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी अल्पवयीन असून गेल्यावर्षी तिचा बालविवाह इंद्रजित जाधव (Indrajeet Jadhav) याच्यासोबत झाला होता. ही मुलगी त्याच्यापासून गर्भवती राहिली होती आणि नुकतीच सातारा जिल्हा रुग्णालयात तिची प्रसूती झाली आहे. त्यानंतर सदरील मुलगी अल्पवयीन असल्याचं समोर आलं. (Getting married to a minor girl; A case of rape has been registered)
ADVERTISEMENT
वयाचा दाखला मागितला आणि सगळं समोर आलं
फलटण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साखरवाडीतील इंद्रजीत जाधव याचा 4 एप्रिल 2022 रोजी अल्पवयीन मुलीशी प्रेम प्रकरणातून विवाह झाला होता. त्यानंतर ती गर्भवती झाली. त्यानंतर 14 मार्च रोजी सातारा जिल्हा रुग्णालयात तिची प्रसूती झाली. डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना वयाचा दाखला मागितला असता मुलीचे वय प्रसूतीवेळी 18 वर्षाचे असल्याचे समोर आले.
Crime: दारु, पॉर्न Video अन् 32 वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलासोबत नको ते केलं!
इंद्रजीत जाधव याच्यावर पोक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल
प्रसूतीवेळी तिचं वय 18 असल्याने तिचा बालविवाह झाल्याचं निष्पन्न झालं. त्याचबरोबर अल्पवयीन मुलीबरोबर लैगिंक संबंध ठेवल्याने तिला गर्भधारणा झाली. बालविवाह कायद्याने गुन्हा आहे. एकूण हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी इंद्रजीत जाधव याच्यावर पोक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल होताच त्याला गजाआड केले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.
Crime News : अल्पवयीन मुलासोबत शारीरीक संबंध…व्हिडिओही बनला…महिला सापडली अडचणीत
सातारा जिल्ह्यातीलच ढेबेवाडी येथे गेल्या आठवड्यात घडली होती धक्कादायक घटना
बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती कार्यरत आहे. अनेकवेळा घरच्यांच्या जबरदस्तीने किंवा प्रेमप्रकरणातून बालविवाह होत आहेत. गेल्या आठवड्यात सातारा जिल्ह्यातीलच ढेबेवाडी येथे धक्कादायक प्रकार घडला होता.अल्पवयीन मुलीची घरातच प्रसूती करून बाळाच्या रडण्याचा आवाज शेजाऱ्यांना जाऊ नये म्हणून अर्भकाचे शीर धडावेगळे करून डोंगराजवळ नाल्यात टाकून दिल्याची धक्कादायक घटना पाटण तालुक्यात एका गावात घडली. पोलिसांनी तत्काळ हालचाली करून याप्रकरणी संबंधित मुलीच्या वडिलांना अटक केली होती.
Nagpur : भयंकर! अल्पवयीन मुलीने youtube बघून केली स्वतःची प्रसुती अन्…
ADVERTISEMENT