तरुणीने अर्धनग्न होऊन पुतिन यांच्यावर केलेला ‘हल्ला’, फोटो होतायेत Viral

मुंबई तक

• 02:48 PM • 14 Mar 2022

जगातील सर्वात शक्तिशाली नेते आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमोर अचानक अर्धनग्न अवस्थेतील एक मुलगी आली आणि तिने थेट ‘पुतिन हुकूमशहा’ असल्याच्या घोषणा दिल्या. हा सगळा प्रकार झाला तेव्हा जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केलही पुतिन यांच्यासोबत होत्या आणि त्या देखील या तरुणीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. यादरम्यान तेथे उपस्थित पत्रकारांनी या घटनेचे फोटो क्लिक केले […]

Mumbaitak
follow google news

जगातील सर्वात शक्तिशाली नेते आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमोर अचानक अर्धनग्न अवस्थेतील एक मुलगी आली आणि तिने थेट ‘पुतिन हुकूमशहा’ असल्याच्या घोषणा दिल्या. हा सगळा प्रकार झाला तेव्हा जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केलही पुतिन यांच्यासोबत होत्या आणि त्या देखील या तरुणीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. यादरम्यान तेथे उपस्थित पत्रकारांनी या घटनेचे फोटो क्लिक केले आणि आता हे फोटो बरेच व्हायरल होत आहेत.

हे वाचलं का?

ही घटना 8 एप्रिल 2013 रोजी ही घटना घडली होती. पण सध्या युक्रेन-रशिया युद्धानंतर हे फोटो पुन्हा व्हायरल होत आहेत. जर्मनीतील हॅनोव्हर शहरात ‘हॅनोव्हर मेसे’ या औद्योगिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा सुरू होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे विशेष पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्यासोबत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केलही होत्या. विशेष बाब म्हणजे त्यावेळी या प्रदर्शनात 100 हून अधिक रशियन कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

यादरम्यान ती टॉपलेस मुलगी पुतिन यांच्यासमोर आली आणि तात्काळ तिने पुतिन यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ओलेक्झांड्रा शेवचेन्को असे या मुलीचे नाव आहे. ती युक्रेनमधील ‘Femen’ या संघटनेशी संबंधित होती. जी महिलांच्या हक्कांवर नव्या पद्धतीने आंदोलन करते.

तेव्हा द गार्जियनशी झालेल्या संभाषणात शेवचेन्कोने या घटनेबद्दल असे सांगितले होते की, ‘मी दुरूनच सूट घातलेल्या पुरुषांचा समूह पाहिला. जेव्हा मी त्या गटात गेले तेव्हा त्यांच्यातील सर्वात लहान उंची असलेल्या पुरुषांपैकी एक पुतिन होते. ते खूप तरुण दिसत होते. तेव्हा मला समजलं की हीच माझ्यासाठी संधी आहे. तेव्हा मी कुंपणावरून उडी मारली आणि कपडे काढून पुतिनच्या दिशेने धावत गेले आणि ओरडले – हुकूमशहा.. हुकूमशहा’

तिथे उपस्थित फोटोग्राफर्सनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. बर्‍याच रिपोर्ट्समध्ये या फोटोचे वर्णन 2013 मधील सर्वात खास न्यूज फोटो म्हणून करण्यात आले होते.

लक्षात घ्या की हा गट अद्यापही सक्रिय आहे. रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान ‘फेमेन’चे सदस्य रशियन हल्ल्याचा निषेध करत आहेत. ते आपल्या छातीवर ‘PEACE FOR UKRAINE’ ‘STOP PUTIN’S WAR’ लिहून आपल्याच सरकारचा निषेध नोंदवत आहेत.

6 मार्च 2022 रोजी या गटातील 50 मुली आयफेल टॉवरजवळ पोहोचल्या आणि तिथे त्यांनी टॉपलेस होऊन आंदोलन केलं होतं. याआधीही 3 मार्च 2022 रोजी स्पेनमधील माद्रिद शहरात देखील मुलींनी आंदोलन केलं होते. हे आंदोलन रशियन दूतावासाबाहेर करण्यात आले होते. या सगळ्या मुलींनी आपले केस फुलांनी झाकलेले पण टॉपलेस होऊन आपल्या छातीवर त्यांनी युक्रेनच्या शांततेसाठी मेसेज लिहले होते.

पुतिन यांच्यावर का भडकली ‘ही’ इंटरनॅशनल मॉडेल?

‘Femen’ ही संस्था जगातील अनेक देशांमध्ये कार्यरत आहेत आणि त्याचे सदस्य वेगवेगळ्या स्त्रीवादी मोहिमा करत राहतात. त्यांची घोषणा अशी आहे की, खुली छाती हेच आमचे शस्त्र आहे.

    follow whatsapp