टोकियो ऑलिम्पिकच्या अखेरच्या दिवशी सुवर्णपदकाची कमाई करुन इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रावर सध्या सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. ऑलिम्पिक स्पर्धेचं सूप वाजल्यानंतर नीरज चोप्रा आज दिल्लीत दाखल झाला. नीरज चोप्रासोबत अनेक भारतीय खेळाडूही आज मायदेशी दाखल झाले. यावेळी शेकडो चाहत्यांनी विमानतळावर गर्दी करत जल्लोषात नीरज चोप्राचं स्वागत केलं.
ADVERTISEMENT
नीरजचं स्वागत करायला दिल्ली विमानतळावक शेकडो चाहते उपस्थित होते. नीरज विमानतळावर दाखल होताच बँड-बाजाच्या तालावर आणि भारत माता की जय च्या जयघोषात नीरज चोप्राला खांद्यावर उचलून घेत त्याची मिरवणूक काढण्यात आली.
२३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिलं गोल्ड मेडल मिळवलं. २००८ साली बिजींग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलं होतं, त्यानंतर सुवर्णपदक पटकावणारा नीरज चोप्रा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. जर्मनी, चेक रिपब्लीक, पाकिस्तान यांचं कडवं आव्हान मोडून काढत नीरजने ८७.५८ मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
मराठा क्रांती मोर्चा करणार Neeraj Chopra चा सत्कार, राज्यस्तरीय बैठकीत ठराव पास
परंतू अंतिम फेरीत येऊन गोल्ड मेडल मिळवण्यापर्यंतचा नीरजचा प्रवास सोपा नव्हता. कठोर मेहनत, परिश्रम आणि सराव या जोरावर नीरजने हे यश साध्य केलं. आपलं ध्येय विचलीत होऊ नये म्हणून नीरजने या दिवसांत सोशल मीडियावर येणं टाळलं होतं.
“मी सोशल मीडियावर आलो नाही, कारण मला माझं पूर्ण लक्ष्य हे अंतिम फेरीवर केंद्रीत करायचं होतं. जर सोशल मीडियावर येऊन मी खूप काही बोलत राहिलो असतो तर गोल्ड मेडल जिंकण्याचे विचार सतत मनात येत राहिले असते. मला माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करायचं होतं आणि त्यासाठी १०० टक्के प्रयत्न करायचे होते. फक्त १५ दिवसांचा प्रश्न होता, आणि यासाठी फोन जवळ न ठेवणं मला चालणार होतं. मी या दिवसांमध्ये फक्त सराव आणि स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केलं होतं.”
ADVERTISEMENT