Govt Jobs 2024 : हवाई दलात मोठ्या पगाराची नोकरी, 12वी पास असाल तर लगेच करा अर्ज

रोहिणी ठोंबरे

• 03:18 PM • 19 Jun 2024

Indian Air Force 2024 Recruitment : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) 'अग्निवीरवायु इनटेक' (Fire air intake) या पदासाठी भरती आहे. 12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

भारती हवाई दलात 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार 28 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात

Indian Air Force 2024 Recruitment : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) 'अग्निवीरवायु इनटेक' (Fire air intake) या पदासाठी भरती आहे. 12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे.  पात्र आणि इच्छुक उमेदवार, 28 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (government job opportunity in indian air force job vacancy for 12th passed apply today)

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

  • अर्ज करणारे उमेदवार, 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा 

  • इंजिनीअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobile/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा 

  • नॉन-व्होकेशनल विषयासह दोन वर्षांचा व्होकेशनल कोर्स उदा. Physics and Mathematics किंवा
  • 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये पंकजा मुंडे, भुजबळ, शेंडगे, तायवाडेंची नावे

शारीरिक पात्रता

शारीरिक पात्रतेविषयी बोलायचं झालं तर, अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये पुरूषांची उंची 152.5 सेमी तर, छाती 77 से.मी./ किमान 05 सेमी फुगवून असणे आवश्यक आहे. तसंच, महिलांची उंची ही किमान  152 से.मी. असावी.     

हेही वाचा : Marashtra Election : अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या नेत्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा


वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 550 रूपये शुल्क आकारले जाणार आहे. 

हेही वाचा : Chhagan Bhujbal : भुजबळ ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? राऊतांनी दिली मोठी बातमी

 

अधिक माहितीसाठी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट https://indianairforce.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://agnipathvayu.cdac.in/avreg/candidate/login

    follow whatsapp