Mazi Ladki Bahin Yojana : चुका टाळा! 1500 रुपये मिळवण्यासाठी कसा भरायचा अर्ज? 

भागवत हिरेकर

03 Jul 2024 (अपडेटेड: 03 Jul 2024, 02:01 PM)

Majhi ladki bahin yojana documents in marathi : महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले जात आहेत. पण, अर्ज कसा भरायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे द्यायचा याबद्दल अनेकांना माहिती नाही. या योजनेबद्दलची सर्व माहिती वाचा...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती वाचा...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वाचा तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती

point

माझी लाडकी बहीण योजना नियम व अटी

point

माझी लाडकी बहीण योजना पैसे

Mazi ladki bahin yojana maharashtra online apply : राज्यातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. पण, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? अर्ज भरताना कोणती कागदपत्रे लागतात? अर्ज कुठे आणि कसा भरायचा याबद्दल गोंधळ आहे. तुम्हालाही या योजनेबद्दल माहिती नसेल, तर जाणून घ्या... (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Documents, online apply and pdf form)

हे वाचलं का?

Mazi ladki bahin yojana : कधीपासून मिळणार पैसे? कोणाला लाभ मिळणार?

महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ मिळणार. 

या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी सरकारने योजनेच्या पात्रता निकषांमध्येही सुधारणा केल्या आहेत. त्याचबरोबर काही अटी शिथिल केल्या आहेत. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहे. 

माझी लाडकी बहीण योजना पात्रतेचे निकष

1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. 
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. 
3) कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्ज करता येणार.
4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे. 
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण अपात्र?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काही अपात्रताही निश्चित करण्यात आल्या आहेत. अपात्रतेचे आठ निकष निश्चित करण्यात आले आहेत.

1) ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. 

2) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.

3) ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले अथवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.

हेही वाचा >> आमदार फुटणार? विधानसभेआधी पुन्हा राजकीय भूकंप? 

4) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपये जास्त लाभ घेतला असेल. 

5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे. 

6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत. 

7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.

8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर कोणती कागदपत्रे द्यावी लागणार?

या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे रहिवाशी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर इतर पर्याय देण्यात आले आहेत. 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, पहा यादी

1) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज

2) लाभार्थी महिलेचे आधार कार्ड

3) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला.

4) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. 

5) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत. 

6) पासपोर्ट आकाराचा फोटो

7) शिधा पत्रिका (रेशन कार्ड)

8) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा?

- योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल अॅप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.

- पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते. पण, ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील.

हेही वाचा >> ज्याच्या सत्संगात 100 जणांचा जीव गेला तो भोले बाबा आहे तरी कोण?

- भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात येईल. अर्ज दाखल केल्यानंतर पोच पावती दिली जाईल.

- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल. त्यासाठी महिलेने कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे शिधा पत्रिका (रेशन कार्ड) आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. 

पीडीएफ फॉर्मसाठी खाली लिंकवर क्लिक करा

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पीडीएफ फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे  View PDF क्लिक करा.

रहिवाशी प्रमाणपत्र नसेल, तर 15 वर्षापूर्वीची ही कागदपत्रे द्यावी लागणार

1) रेशन कार्ड
2) मतदार ओळखपत्र 
3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 
4) जन्म दाखला 

- या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. 

- माझी लाडकी बहीण योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता या योजनेतील लाभार्थी महिलांची वयोमर्यादा आधी 21 ते 60 वर्ष होती. ती नंतर 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आली आहे.

इतर राज्यातील महिलांही करू शकता अर्ज

- परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राचा रहिवाशी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. 

Mazi Ladki Bahin Yojana Documents : उत्पन्नाचा दाखला नसेल, तर काय कराल?

- या योजनेसाठी अडीच लाखांच्या उत्पन्नाची अट आहे. मात्र, उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, तर ज्यांच्या पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे. ते रेशन कार्ड जोडून अर्ज भरतात. योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

 

    follow whatsapp