केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मोठी भरती, 12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 

रोहिणी ठोंबरे

15 Jun 2024 (अपडेटेड: 15 Jun 2024, 11:27 AM)

CAPF Recruitment : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (Central Armed Police Forces) असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) आणि वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) या दोन पदांवर नोकरीची संधी आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरीची संधी

point

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

Central Armed Police Force Recruitment : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (Central Armed Police Forces) असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) या पदासाठी 243 जागा आहेत. तर, वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) या पदासाठी 1283 जागा आहेत. अशा एकूण 1526 जागांसाठी ही सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 08 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (government Job recruitment in central armed police force on 1526 seats golden opportunity for 12th pass)

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

  • असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)- 1) 12वी उत्तीर्ण 2) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)

  • हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क)- 1) 12वी उत्तीर्ण  2) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. येणे आवश्यक आहे.

हेही वाचा : 'मोदींच्या मंत्रिमंडळात मला स्थान मिळाले तर...'; सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या!

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Maharashtra Vidhan Sabha : ठाकरेंचा मोठा प्लॅन! स्वतंत्र लढण्याची तयारी! Inside Story

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जाईल. तर, एससी/ एसटी/इक्सएसएम/ महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.mha.gov.in/en/about-us/central-armed-police-forces वरून माहिती मिळवू शकता.

हेही वाचा : खासदार बाळ्या मामांचा एक फोन अन् थेट कलेक्टरचा आदेश..

नोकरीची लिंक

https://rectt.bsf.gov.in/registration/basic-details?guid=234fb396-0d25-11ef-ba98-0a050616f7db
 

    follow whatsapp