Governor Bhagat Singh Koshyari is absent in PM Modi event: मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे आज (10 फेब्रुवारी) मुंबई (Mumbai) दौऱ्यावर होते. इथे त्यांनी मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत ट्रेनचं (Vande Bharat Train) लोकार्पण केलं. तसंच बोहरा मुस्लिम समाजाच्या एका कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींचा हा गेल्या काही दिवसातील दुसरा मुंबई दौरा आहे. दरम्यान, आजच्या मोदींच्या दौऱ्यापेक्षा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याविषयीच अधिक चर्चा रंगली होती. (governor bhagat singh koshyari went to welcome pm modi but turned his back on the programme why was governor absent)
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदी हे 19 जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबईत मेट्रो आणि इतर काही विकासकामांचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या स्वागतापासून ते कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सोबतच होते. मात्र, पंतप्रधान मोदींच्या आजच्या संपूर्ण कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी हे कुठेही दिसून आले नाही. ज्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी का नव्हते हजर?
जेव्हा पंतप्रधान मोदी हे मुंबई दाखल झाले त्यावेळी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी स्वत: राज्यपाल हे हजर होते. यावेळी इतरही काही नेतेमंडळी हजर होते. ज्यांची ओळख देखील कोश्यारींनी पंतप्रधान मोदींना करून दिली.
यानंतर पंतप्रधान मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने रवाना. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अनेक मंत्री उपस्थित होते. मात्र यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे व्यासपीठावर कुठेही दिसून आले नाही. त्यानंतर बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात देखील कोश्यारी दिसून आले नाही.
दरम्यान, याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळेच ते मोदींच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही. जेव्हा कोश्यारी हे पंतप्रधान मोदींना विमानतळावर भेटले त्यावेळी त्यांनी आपली प्रकृती बरं नसल्याचं त्यांना सांगितलं. तिथेच आपण कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकत नसल्याचंही कोश्यारींनी मोदींना सांगितलं. म्हणजेच फक्त प्रकृती अस्वस्थामुळे कोश्यारी हे पंतप्रधानांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही.
राज्यपाल कोश्यारींनी मोदींकडे व्यक्त केलेली राजीनामा देण्याची इच्छा
पंतप्रधान मोदी हे 19 जानेवारीला जेव्हा मुंबईत आले होते त्यावेळी स्वत: भगतसिंह कोश्यारींनी आपल्याला राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा असल्याचं सांगितलेलं. याबाबतची माहिती राज्यपालांनी स्वत: ट्विटरवरुन 23 जानेवारीला दिली होती.
‘माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.’ असं राज्यपाल त्यावेळी म्हणाले होते.
यानंतर असा अंदाज वर्तवला जात होता की, आता भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवलं जाईल. मात्र, अद्यापही तशा स्वरुपाचा कोणताही निर्णय झालेला नाही.
Mumbai : “मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग”; PM मोदींची बोहरा मुस्लीम समाजाला भावनिक साद
आजवरचे सर्वात वादग्रस्त राज्यपाल:
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आजवरचे सर्वात वादग्रस्त राज्यपाल मानले जातात. नोव्हेंबर २०१९ मधील वादग्रस्त शपथविधी, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वादग्रस्त संबंध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबतची वादग्रस्त विधान, मुंबईबाबतचं वादग्रस्त वक्तव्य असे अनेक मुद्दे त्यांच्यासाठी वादाचे ठरले होते.
ADVERTISEMENT