कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या देशात आरोग्य व्यवस्थेवर चांगलाच ताण पडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणांहून लोकं वैद्यकीय उपकरणं सरकारी यंत्रणांसाठी उपलब्ध करुन देत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान कार्यालय आणि Department of Science and Technology ने Oxygen Concentrators बनवणाऱ्या पुणेकर तरुणांच्या स्टार्टअपला उत्पादनाची परवानगी दिली आहे. IIT कानपूरमधून शिक्षण घेतलेल्या तीन पुणेकरांनी भारतीय लष्करासाठी Oxygen Concentrators बनवण्याच्या प्रकल्पाला (ChemDist Membrane Systems Pvt Ltd) सुरुवात केली. सुनील ढोले, संदीप पाटील आणि तुषार वाघ अशी या तरुणांची नावं आहेत.
ADVERTISEMENT
“गेल्या वर्षभरापासून आम्ही या प्रकल्पावर काम करत आहोत. मध्यंतरी भारत आणि चीन यांच्यात सीमेवर जो काही तणाव सुरु होता त्यावेळी आम्ही बनवलेल्या Oxygen Concentrators ला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतू सध्याच्या परिस्थितीत जेव्हा देशात सर्व ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासायला लागली त्यावेळी आम्ही कोविडसाठी हे Oxygen Concentrators बनवण्याचा निर्णय घेतला. हे Oxygen Concentrators बनवण्यामागचं तंत्रज्ञान आम्हाला माहिती होतं त्यामुळे दहा दिवसांमध्ये आम्ही ही गोष्ट करु शकलो.” डॉ. सुनील ढोले यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना माहिती दिली.
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर काम कसं करतं? (How does Oxygen Concentrate work?)
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे एक पोर्टेबल मशीन आहे. ज्याच्या मदतीने रुग्णांसाठी हवेतून ऑक्सिजन तयार केला जातो. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर प्रेशर स्वेंग ऑबर्झव्हेशन टेक्नोलॉजीच्या वापर करतं. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे अशा जागी वापरलं जातं जिथे द्रव (Liquid) ऑक्सिजन किंवा प्रेश्चरायईज्ड ऑक्सिजनचा वापर हा धोकादायक ठरु शकतो.
घरात किंवा छोट्या क्लिनिकमध्ये याचा वापर करताना ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे हवेतून नायट्रोजन वेगळं करतं आणि ऑक्सिजनच्या अधिक असणाऱ्या वायूला बाहेर काढतं. ज्याचा वापर ऑक्सिजनची गरज असणारे रुग्ण करु शकतात. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे औद्योगिक प्रक्रियांमध्ये देखील ऑक्सिजनचा सर्वात स्वस्त स्त्रोत आहे. जिथे यांना ऑक्सिजन गॅस जनरेटर किंवा ऑक्सिजन जनरेशन प्लांट म्हणून ओळखलं जातं.
राज्यभरासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात व्हायच्या आधीच येणाऱ्या काळात ऑक्सिजनची कमतरता भासेल याला अंदाज या तीन मित्रांना आला होता. संदीप पाटील याच्या आईला मार्च महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. धुळे जिल्ह्यात तिच्यावर उपचार करण्यासाठी संदीपला खूप धावपळ करावी लागली. त्यावेळी राज्यातली परिस्थिती फारशी बिघडली नव्हती, ऑक्सिजनची कमतरताही नव्हती…पण येणाऱ्या काळात हा धोका तयार होईल याचा आम्हाला अंदाज आला होता. यानंतर आम्ही कोविडकाळात Oxygen Concentrate बनवण्याचा निर्णय घेतला. ४ मे रोजी आम्हाला केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडून परवानगी मिळाली. पंतप्रधान कार्यालयामार्फत ONGC च्या CSR फंडामधून आम्हाला ४५०० Oxygen Concentrate ची पहिली ऑर्डरही मिळाल्याचं संदीप पाटील यांनी सांगितलं.
दरम्यानच्या काळात या तिन्ही मित्रांच्या कंपनीला तेलंगणा, मध्य प्रदेश आणि काही खासगी हॉस्पिटल्सकडूनही Oxygen Concentrate च्या ऑर्डर मिळायला सुरुवात झाली आहे. ज्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही ८० ते ९० पर्यंत घसरली आहे त्यांच्यासाठी आपण बनवलेले Oxygen Concentrate अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असल्याची माहिती सुनील ढोले आणि संदीप पाटील यांनी दिली. सध्या Oxygen Concentrate बनवण्यासाठीचे अनेक भाग हे तरुण परदेशातून मागवत आहेत. परंतू येणाऱ्या काळात या भागांचं उत्पादनही भारतात करण्याचा विचार या तरुणांचा आहे.
Oxygen Concentrate बनवण्यासाठी लागणारा कच्चा मालही आम्ही भारतातच तयार केला की याची किंमतही कमी होईल. ज्यामुळे सामान्य लोकांना हे खरेदी करणं सहज शक्य होईल असं मत या तिन्ही मित्रांनी व्यक्त केलं आहे.
ADVERTISEMENT