Couple Viral Video: नवरीच्या बोटात अंगठी जात नव्हती! पंडितने केलं असं काही...नवरा कोमात, पाहुणे जोमात

मुंबई तक

30 Sep 2024 (अपडेटेड: 30 Sep 2024, 04:55 PM)

Groom And Bride Video Clip Viral : लग्नसोहळ्यात असे काही रिती रिवाज असतात, जे आयुष्यभर लक्षात राहतात. लग्नातील फोटो अल्बम किंवा व्हिडीओ पाहून ते क्षण जेव्हा आठवतात, तेव्हा चेहऱ्यावर स्मित हास्य आल्याशिवाय राहत नाही.

Husband And Wife Video Viral

Couple Video Clip Viral

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवरा-नवरीचा भन्नाट व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

point

नवऱ्याने नवरीसोबत लग्नमंडपात केलं असं काही... Video पाहून थक्कच व्हाल

point

लग्नसोहळ्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Groom And Bride Video Clip Viral : लग्नसोहळ्यात असे काही रिती रिवाज असतात, जे आयुष्यभर लक्षात राहतात. लग्नातील फोटो अल्बम किंवा व्हिडीओ पाहून ते क्षण जेव्हा आठवतात, तेव्हा चेहऱ्यावर स्मित हास्य आल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लग्नसोहळ्यात नवरा-नवरीकडून नकळत झालेल्या छोट्या-मोठ्या चूका आयुष्याचा अविस्मरणीय भागच बनतो. असाच एक अनुभव एका जोडप्याच्या मजेशीर व्हिडीओतून समोर आला आहे. नवरीच्या बोटात अंगठी जात नव्हती, त्यावेळी पंडितने जे काही केलं, ते पाहून नवरा-नवरीही लोटपोट हसू लागली. नवरा-नवरीचा हा भन्नाट व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाही. 

हे वाचलं का?

मंत्र सुरु असताना इंग्रजीत दिला सल्ला

@aashhoudit आणि @shiva oudit नावाच्या यूजर्सने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक सुंदर कपल लग्नाचे रिती रिवाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नवरा नवरीला अंगठी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. पण नवरीच्या बोटात अंगुठी जात नाही. नवरा आरामात नवरीच्या बोटात अंगठी घालण्याचा प्रयत्न करतो, पण नवरीच्या बोटात अंगठी व्यवस्थित बसत नाही. नवऱ्याला नवरीला अंगठी घालण्यासाठी खूप वेळ लागत असल्याने पंडित मंत्र वाचायला सुरुवात करतो.

याचदरम्यान पंडित इंग्रजीत म्हणतो, शी नीड्स टू गो टू जिम, म्हणजेच नवरीला जिमला जायची गरज आहे. पंडितचा भन्नाट डायलॉग ऐकून नवरीही पोट धरून हसते. पण नवऱ्यालाही हसू आवरत नाही. या व्हिडीओला शेअर करत नवरा-नवरीने लग्नाचा सर्वात अविस्मरणीय क्षण सांगितला आहे. हा मजेशीर व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

तसच अनेक नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये स्माईली इमोजीही सेंट केले आहेत. हा मजेशीर व्हिडीओ लोकांना इतका पसंत आला आहे की, या व्हिडीओला 1 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. लग्नसोहळ्यात नवरा-नवरीचे अनेक भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. पण या कपलचा व्हिडीओ खूप मजेशीर असून सोशल मीडियावर तमाम नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

    follow whatsapp