मुंबई: मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation)सकाळी-सकाळी मुंबईकरांसाठी (Mumbai) एक चांगली बातमी दिली आहे. ती म्हणजे मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या व समुद्र किनारे सुरु होणार आहेत. यासाठी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेच्या या निर्णयामुळे मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मागील अनेक दिवसांपासून ही सर्व मनोरंजनाची ठिकाणं बंदच होती. पण आता ही सर्व ठिकाणी सुरु करण्यात आल्याने मुंबईकरांना काहीसा विरंगुळा मिळणार आहे.
मुंबई महापालिकेने परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?
राज्य शासनाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या व समुद्र किनारे हे सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल.
मात्र असं असलं तरीही सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर यासारख्या इतर उपाययोजना अनिवार्य राहतील. असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.
मुंबई महापालिकेच्या या निर्णयामुळे या भागात असणाऱ्या छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांना देखील फायदा होणार आहे. कारण गेले अनेक दिवस ही ठिकाणं बंद असल्याने त्यांना प्रचंड नुकसान सोसावं लागत होतं. मात्र, आता महापालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे येथील व्यापाऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे.
हॉटेल्स, रेस्तराँ, मॉल्स देखील रात्री 10 वाजेपर्यंत असणार सुरु
दरम्यान, राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील हॉटेल्स, रेस्तराँ, मॉल्स आणि दुकानं हे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. कालपासून (15 ऑगस्ट) हा निर्णय लागू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या आठवड्यात हॉटेल आणि रेस्तराँ मालकांच्या असोसिएशनचं शिष्टमंडळ भेटलं होतं. तुम्हाला लवकरच दिलासा देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला होता.
एकीकडे हॉटेल्स, रेस्तराँ आणि मॉल्स यांना दिलासा देण्यात आला असला तरी धार्मिक स्थळं, सिनेमागृहं आणि नाट्यगृहं हे मात्र अद्यापही सुरु करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत ही या गोष्टी बंदच राहणार आहेत.
उपाहारगृहे यांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याला जास्तीत जास्त 200 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. तसेच हॉलमध्ये जेवढी आसन क्षमता असते त्यामध्ये 50 टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा 100 या पेक्षा जास्त लोकांना परवानगी नसेल.
Mumbai Local: Train प्रवासाला परवानगी अन् डोंबिवली स्टेशनात पुन्हा गर्दी
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सर्व हॉटेल्स, दुकानं आणि रेस्तराँ ही आता रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहेत. कोव्हिड प्रोटोकॉल पाळणं हे मात्र बंधनकारक असणार आहे.
हॉटेलमध्ये वेटर्सनीही मास्क घालणं बंधनकारक आहे. याशिवाय जर वेटिंग असेल तर वेटिंगमध्ये थांबलेल्या लोकांनीही देखील मास्क घालणं आणि कोव्हिडच्या सगळ्या निर्बंधांचं पालन करणं आवश्यक आहे.
ADVERTISEMENT