मुंबई : अखेर राज्यातील सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री उशिरा पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली. यात भाजपकडे 21 तर शिंदे गटाकडे 14 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय शिंदे गटानेही स्वतःचे गड राखण्यात यश मिळविले आहे.
ADVERTISEMENT
औरंगाबाद, नाशिक, जळगावचे पालकमंत्री शिंदे गटाकडे :
शिंदे गटाने शिवसेनेकडे आधीपासून असलेल्या औरंगाबाद, नाशिक, जळगावचे पालकमंत्री आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळविले आहे. औरंगाबादच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि अतुल सावे या मंत्र्यांमध्ये चुरस होती. औरंगाबादच्या तिढ्यावरुनच पालकमंत्र्यांची यादी जाहीर होणे रखडले असल्याचे सांगितले जात होते. इथे आता भुमरे यांनी बाजी मारली आहे.
याशिवाय नाशिकच्या पालकमंत्रीपदी दादा भुसे आणि जळगावचे पालकमंत्रीपद गुलाबराव पाटील यांच्याकडे कायम राहिले आहे. तर भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे धुळे, लातूर आणि नांदेडची जबाबदारी देण्यात आली आहे. जळगावच्या पालकमंत्रीपदासाठी महाजन यांच्या नावाची चर्चा होती.
कोणत्या जिल्ह्यात कोण असणार पालकमंत्री?
-
देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली
-
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
-
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया
-
चंद्रकांत पाटील – पुणे
-
विजयकुमार गावित – नंदुरबार
-
गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड
-
गुलाबराव पाटील – जळगाव, बुलढाणा
-
दादा भुसे -नाशिक
-
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम
-
सुरेश खाडे – सांगली
-
संदिपान भुमरे – औरंगाबाद
-
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
-
तानाजी सावंत -परभणी, उस्मानाबाद
-
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग
-
अब्दुल सत्तार – हिंगोली
-
दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर
-
अतुल सावे – जालना, बीड
-
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
-
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
ADVERTISEMENT