ADVERTISEMENT
क्रिकेट खेळत असताना एका तरुणाचा मैदानावरच मृत्यू झाला.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये ही घटना घडली आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूचा मृत्यू झाला.
क्रिकेट खेळत असतानाच हृदयविकाराचा झटका आला आणि तो जागेवरच पडला.
स्थानिक क्रिकेट स्पर्धेत जीएसटी कर्मचारी आणि सुरेंद्रनगर जिल्हा पंचायत यांच्यात हा सामना झाला.
जिल्हा पंचायत संघाच्या फलंदाजीदरम्यान जीएसटी कर्मचारी संघातील खेळाडूवर काळाने घाला घातला.
वसंत राठोड असे मृत तरूणाचे नाव आहे. व्हिडीओमध्ये गोलंदाजी करताना त्याला त्रास होताना दिसतंय.
तो खाली बसला, सहकारी खेळाडूंनी त्याला पाणी पाजलं. पण, यावेळी त्याला काय होतंय हे कोणालाच समजलं नाही.
चार दिवसांपूर्वी असाच क्रिकेट सामना खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला होता.
ADVERTISEMENT