ADVERTISEMENT
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविचसोबत दोन पद्धतीत लग्नं केलं.
हार्दिक नताशाने 14 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केलं होतं.
पण आता दुसऱ्यांदा भारतीय परंपरेतून हार्दिकने नताशासोबत लग्न केलंय.
लग्नाचे फोटो हार्दिक पांड्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.
सात फेरे घेत, भांगेत सिंदूर लावत, हार घालून दोघांनी धुमधडाक्यात लग्न उरकलंय.
हार्दिकने डेटनंतर जानेवारी 2020 मध्ये सर्बियन मॉडेल नताशाला प्रपोज केले होते. आता 3 वर्षांनंतर लग्नबंधनात खऱ्या अर्थाने अडकले आहेत.
हार्दिक आणि नताशा यांना 2 वर्षांचा मुलगाही आहे. ज्याचं नाव अगस्त्य आहे, तोही लग्नाला उपस्थित होता.
ADVERTISEMENT