मधुमेहाच्या रूग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टींचे करा सेवन…

मुंबई तक

• 02:05 PM • 08 Apr 2023

मधुमेहाच्या रुग्णांना शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य आहार, वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

Mumbaitak
follow google news

Diabetes Patient : मधुमेहाच्या रुग्णांना शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य आहार, वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या आणि जीवनशैलीच्या काही सवयी बदलूनही मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. सकाळी उठल्यावर शरीराला पूर्ण दिवस स्फुर्तीदायी ठेवण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो. मधुमेच्या रूग्णांसाठी हा वेळ सर्वात महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी या वेळेत रिकाम्या पोटी अशा गोष्टींचे सेवन करावे ज्यामधून त्यांचं पोटही भरेल आणि प्रोटीन, कार्ब्स, फायबरही मिळेल. तसेच सकाळी उठल्यावर नाश्ता कधीही वगळू नका कारण तो दिवसाचा पहिला आहार आहे. (Healthy Diet Tips For Diabetes Patient)

हे वाचलं का?

अनेक मधुमेही रूग्णांचे सकाळी उठल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यामागचे कारण म्हणजे, आपले यकृत दिवसभर उर्जेसाठी ग्लुकोज तयार करते. जर आपल्याला खूप तहान लागत असेल, सारखं लघवीला जावं लागत असेल किंवा सकाळी अस्पष्ट दिसत असेल तर ही लक्षणं रक्तातील साखरेची पातळी वाढल्याची आहेत. अशा स्थितीत सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी काही गोष्टींचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळेल. चला मग जाणून घेऊयात.

    follow whatsapp