Kaali Row: “हिंदुत्व म्हणजे आपला भारत देश नाही, लीना मणिमेकलाईंची पोस्ट चर्चेत”

मुंबई तक

• 09:29 AM • 07 Jul 2022

काली या सिनेमाच्या पोस्टरवरून वाद रंगलेला असतानाच या सिनेमाच्या दिग्दर्शिका लीना मणिमेकलईंची आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे. हिंदुत्व म्हणजे आपला भारत देश नाही या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. त्याआधी लीना मणिमेकलई यांनी भगवान शंक आणि पार्वतीच्या रूपात असलेले कलाकार सिगारेट ओढताना दाखवले होते. तर २ जुलैला त्यांनी काली नावाच्या सिनेमाचं पोस्टर पोस्ट केलं […]

Mumbaitak
follow google news

काली या सिनेमाच्या पोस्टरवरून वाद रंगलेला असतानाच या सिनेमाच्या दिग्दर्शिका लीना मणिमेकलईंची आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे. हिंदुत्व म्हणजे आपला भारत देश नाही या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. त्याआधी लीना मणिमेकलई यांनी भगवान शंक आणि पार्वतीच्या रूपात असलेले कलाकार सिगारेट ओढताना दाखवले होते. तर २ जुलैला त्यांनी काली नावाच्या सिनेमाचं पोस्टर पोस्ट केलं होतं. ज्यामध्ये कालीमाता सिगारेट ओढताना दाखवली गेली आहे. ज्यानंतर बराच वाद निर्माण झाला.

हे वाचलं का?

Kaali Poster : ‘काली’मातेला सिगारेट ओढताना दाखवल्याचा वाद नेमका आहे तरी काय?

लीना मणिमेकलई यांनी काय म्हटलं आहे?

भाजपच्या पे रोलवर असलेल्या ट्रोल आर्मीमुळे मला काहीही फरक पडत नाही. त्या लोकांना माहित नाही की विविध गावांमध्ये असणारे लोककलाकार हे त्यांची कला सादर करून झाल्यानंतर कशाप्रकारे विरंगुळा शोधत असतात. हा प्रश्न माझ्या एकटीच्या सिनेमाचा नाही. संघाचे लोक विनाकारण या सगळ्या गोष्टी शोधून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते की हिंदुत्व म्हणजे आपला भारत देश नाही. या आशयाचं ट्विट लीना मणिमेकलईने केलं आहे.

लीना मणिमेकलाई यांचं काली सिनेमाच्या पोस्टरबाबत काय म्हणणं आहे?

या पोस्टरवर जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा लीना मणिमेकलाई यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की माझी डॉक्युमेंट्री समाजातल्या विविध घटनांवर भाष्य करते. एका संध्याकाळी काली माता प्रकट होते तेव्हा ती टोरांटोच्या रस्त्यांवर फिरत असते. हा पाहून अरेस्ट लीना मणिमेकलाई हा हॅशटॅग पोस्ट करू नका त्याऐवजी हॅशटॅग लव्ह यू लीना मणिमेकलाई असं लिहा. ही प्रतिक्रिया लीना मणिमेकलाई यांनी दिली आहे. लीना यांनी ही प्रतिक्रिया देऊनही सोशल मीडियावर नाराजी कमी झालेली नाही. लोकांनी तिला ट्रोल करणं सोडलेलं नाही. तसंच आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचलं आहे.

काली नावाच्या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरचा वाद काय?

लीना मणिमेकलई यांनी जे पोस्टर ट्विट केलं आहे ते पोस्टर काली या डॉक्युमेंट्रीचं आहे. या पोस्टरवर कालीमातेला सिगारेट ओढताना दाखवण्यात आलं आहे. एवढंच नाही तर कालीमातेच्या हाती LGBTQ समुदायाचा झेंडाही हातात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या पोस्टवरवरून प्रचंड वाद निर्माण झाला आहे. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे प्रकरण आता पोलिसात गेलं आहे.

नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने काली या फिल्मच्या वादग्रस्त पोस्टवर कारवाई करण्याचं ठरवलं आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात FIR दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांना काली या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवर वाद निर्माण झाल्यानंतर अनेक तक्रारी आल्या होत्या त्यानंतर ही कारवाई पोलिसांनी केली आहे.

    follow whatsapp