लाजिरवाणं कृत्य! मतिमंद मुलावर केला अत्याचार; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई तक

• 04:07 AM • 18 Sep 2021

हिंगोली जिल्ह्यात अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील 12 वर्षाच्या मतिमंद मुलावर तुरीच्या शेतात नेऊन एका आरोपीने अत्याचार केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली. पीडित […]

Mumbaitak
follow google news

हिंगोली जिल्ह्यात अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील 12 वर्षाच्या मतिमंद मुलावर तुरीच्या शेतात नेऊन एका आरोपीने अत्याचार केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला.

हे वाचलं का?

या प्रकरणी पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.

पीडित मुलगा आपल्या आईवडिलांबरोबर गोरेगावातील एका चाळीत राहतो. त्याचे आई-वडील शेतात मजुरीचं काम करतात. सायंकाळच्या सुमारास तो आपल्या मित्रांबरोबर गणपतीच्या आरतीसाठी लागणारी फुलं आणण्यासाठी जवळच असलेल्या शेतात गेला होता. तिथे आरोपीने व्यक्तीने त्याच्यावर शेतात नेऊन अत्याचार केला.

मुलगा मतिमंद असल्याची माहिती आरोपीला होती. मात्र, तरीही आरोपीने त्याला वासनेची शिकार बनवलं. ही सगळी घटना पीडित मुलासोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी बघितली. मात्र, याबद्दल कुणाकडेही वाच्यता केल्या जिवे मारू अशी धमकी आरोपीने प्रत्यक्षदर्शी मुलांना दिली होती.

दरम्यान घटना समोर आल्यानंतर विकृत व्यक्ती विरोधात गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटकदेखील करण्यात आली आहे. घटनेनंतर नागरिकांकडून आरोपीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

    follow whatsapp