वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात हट्टा ग्रामीण पोलीस स्टेशनं च्या पथकाने छापा टाकून हळदीच्या शेतातुन 76.69 किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत बाजारात ६ लाखांच्या घरात असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गुंडा शिवारातील शेतकरी उत्तम मारोतराव भालेराव यांनी आपल्या शेतात हळदीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केली असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दि. १ डिसेंबर रोजी हट्टा ग्रामीण पोलिस स्टेशनं च्या पथकाने घटना स्थळी छापा मारला असता हळदीच्या शेतात १४३ गांजाची झाडे मिळून आली.
याप्रकरणी पोलिसांनी शेतकरी उत्तम भालेराव याला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
‘अवकाळी आला, अवकळा आली’; हातातोंडाशी आलेलं पिक वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदील
ADVERTISEMENT