HMPV Virus Cases : देशभरात वाढले HMPV चे रुग्ण, तब्बल 30 टक्के रुग्ण महाराष्ट्रात, कोणकोणत्या राज्यात रुग्णांना लागण?

चीनमध्ये या विषाणूच्या संसर्गाशी संबंधित प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानं भारतातही भीती निर्माण झाली आहे. काही लोक या आजाराची तुलना कोविड-19 शी करत असल्याचंही दिसतंय.

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:06 PM • 08 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

HMPV व्हायरसचे देशभरात वाढले रूग्ण

point

HMPV व्हायरसची लक्षणं नेमकी कोणती?

चीननंतर भारतातही ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) चा प्रवेश झाल्यामुळे चिंता वाढू लागली आहे. आता मुंबईत एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात सहा महिन्यांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. बेंगळुरू, नागपूर, तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन आणि पश्चिम बंगाल, अहमदाबाद आणि मुंबईमध्ये प्रत्येकी एक प्रकरण नोंदवण्यात आलं आहे. नोव्हेंबरमध्ये कोलकाता इथे HMPV चे एक प्रकरण समोर आलं होतं. सहा महिन्यांच्या मुलाला या विषाणूची लागण झाली होती.

हे वाचलं का?

कोविड-19 सारखा नाही HMPV 

चीनमध्ये या विषाणूच्या संसर्गाशी संबंधित प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानं भारतातही भीती निर्माण झाली आहे. काही लोक या आजाराची तुलना कोविड-19 शी करत असल्याचंही दिसतंय. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले, एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही. 2001 मध्येच हा पहिल्यांदा आढळला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा व्हायरस जगभरात पसरतोय. चीनमध्ये एचएमपीव्हीची प्रकरणं वाढत असताना, भारत सरकारही सतर्क झालं आहे.

हे ही वाचा >> Pune Crime News : कंपनीच्या पार्किंगमध्ये 28 वर्षीय तरूणीची कोयत्याने सपासप वार करत हत्या, कंपनीत सोबतच करत होते काम

6 महिन्यांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण

मुंबईत ज्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याचं समोर आलंय, ती फक्त सहा महिन्यांची आहे. 1 जानेवारीला या मुलीला खोकला येऊ लागला, छातीत त्रास सुरू झाला आणि ऑक्सिजनची पातळी 84 टक्क्यांपर्यंत घसरली. त्यानंतर या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी नवीन रॅपिड पीसीआर टेस्ट केली आणि मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. 

हे ही वाचा >> ECI Press Conference : ईव्हीएम मशिन हॅक होऊ शकतं? 6 वाजेनंतर मतदान कसं वाढतं? निवडणूक आयोगाने दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

HMPV ची लक्षणं

एचएमपीव्ही हा एक विषाणू आहे ज्यामुळे फुफ्फुस आणि श्वसनमार्गामध्ये संसर्ग होतो. यामुळे सर्दी किंवा फ्लू सारखी स्थिती निर्माण होते. आधीच आजारी असलेल्या किंवा ऍलर्जीने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये HMPV संसर्ग सामान्य आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (6 जानेवारी) सांगितलं की, इतर काही राज्यांमध्ये एचएमपीव्हीची प्रकरणं समोर आल्यानंतर लोकांनी घाबरून जाऊ नये. सरकार लवकरच याबद्दलच्या गाईडलाईन्स जाहीर करेल. 

    follow whatsapp