मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळले आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. मात्र यातील कुणबी समाजाला खासकरून विदर्भातील कुणबी समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं मोठं काम डॉ.पंजाबराव देशमुखांनी केलं होतं. राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रगल्भ असणाऱ्या डॉ.पंजाबराव देशमुखांनी विदर्भातील कुणबी समाजाला आरक्षण कसं मिळवून दिलं याची ही कहाणी
ADVERTISEMENT
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत हे लक्षात घेऊन पंजाबरावांनी कृषी विकास हाच भारतीय प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरविला आणि आपले सर्व प्रयत्न, सर्व जीवन त्याकरिता खर्ची घातले. डॉ. पंजाबराव देशमुख हे देशाच्या राजकारणातील एक अग्रगण्य असं नाव होतं. विदर्भात खास करून नागपूर जिल्ह्य़ाचा पूर्व भाग, काटोल, नरखेड, व काही प्रमाणात उमरेड या तालुक्यात व अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, या जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात कुणबी समाज वास्तव्यास होता. डॉ.पंजाबराव देशमुख हे सुध्दा कुणबी समाजाचेच होते. विदर्भातील हा कुणबी समाज हा जमीनदार आणि शेतकरी होता. शेतीवर अवलंबून असणारा हा कुणबी समाज मागासलेला असल्याने त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुखांनी महत्वाचं कार्य केलं.
या कुणबी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेमध्ये काही तरतुदी कराव्यात अशी सुचना त्यांनी बाबासाहेबांना केली, त्यानंतर 60च्या दशकात पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी मराठा नसून मराठा ‘कुणबी’ आहे अशी मांडणी केली आणि ती घटनात्मकरीत्या मंजूर करण्यात आली. त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली. आणि त्यामुळेच विदर्भातील बहुसंख्य कुणबी समाजाला आरक्षण मिळाले. यामागे डॉ.पंजाबराव देशमुखांचा खूप मोठा हात होता. पंजाबराव देशमुखांच्या या दूरदृष्टीचा फायदा विदर्भातील कुणबी समाजाला आत्तापर्यंत होतो आहे.
विदर्भातील या कुणबी समाजाला खऱ्या अर्थाने या आरक्षणाचा फायदा १९९० ला आलेल्या मंडल आयोगांच्या शिफारशींनंतर झाला. कारण या विदर्भातील कुणबी समाजाने आधीच आपल्या जात प्रमाणपत्रात मराठा वगळून फक्त कुणबी अशी नोंद केल्याने एकूण १९ टक्के ओबीसी प्रवर्गात विदर्भातील कुणबी समाजाला ही स्थान मिळाले. या सर्वांमागे डॉ.पंजाबराव देशमुखांची दुरदृष्टी प्रामुख्याने कारणीभूत होती. देशमुखांनी विदर्भातील कुणबी समाजाला वेळीच जागं केलं. समाजातील मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांनी उचलेलं हे महत्वाचं पाऊल विदर्भातील कुणबी समाजातील अनेक पिढ्यांना फायदेशीर ठरलं आणि ठरत आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुखांचं हे योगदान खूप महत्वाचं आहे.
ADVERTISEMENT