मुंबई: देशात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत होते. मात्र मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. पण परिस्थिती अद्यापही सामान्य झालेली नाही. कारण तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेचा (Corona Third Wave) अंदाज व्यक्त केला आहे. तसंच ही लाट मुलांसाठी (Children) अधिक धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अशा परिस्थितीत भारतासह जगभरात मुलांच्या लसीबाबत (Vaccine For Children) काम वेगाने सुरु आहे.
ADVERTISEMENT
आता, प्रौढांव्यतिरिक्त, देशातील 18 वर्षाखालील 15 कोटी मुलांना लस देण्याचे सरकारसमोर आव्हान आहे. तेही अशा वेळी जेव्हा देशातील कोणतीही लस अद्याप मुलांसाठी पूर्णपणे तयार नाही. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लस वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु भारतात अद्याप मुलांसाठी लस क्लिनिकल ट्रायल स्टेजवर आहे.
मुलांच्या लसीकरणाच्या तयारीसंदर्भात नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणतात, ‘देशात मुलांच्या कोरोना लसीबाबत ट्रायल सुरू आहे. भारतात मुलांची संख्या खूप मोठी आहे. अशावेळी देशात मुलांसाठी 25 कोटी लस डोस लागणार आहेत. कारण आपण कुणालाही लसीपासून वंचित ठेऊ शकत नाही. जर धोका कमी करायचा असेल तर सर्व मुलांना लस द्यावी लागेल.
‘Corona ची तिसरी लाट लहान मुलांसाठी किती घातक? याबाबत कोणताही डेटा उपलब्ध नाही’
मुलांची लस वेगळी असेल का?
अमेरिका आणि जिथे-जिथे मुलांना लस मंजूर झाली आहे तिथे तीच लस मुलांनाही दिली जात आहे जी प्रोढांना दिले जाते. अमेरिकेत, फायझरने 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लस मंजूर केली आहे.
फायझरची ही लस गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेसह अनेक देशांमधील प्रोढांना दिली जात आहे. त्यानंतर मुलांवर याची चाचणी घेण्यात आली व ती प्रभावी असल्याचे दिसून आले. आता त्याची चाचणी 12 वर्षांखालील मुलांवरही चालू आहे आणि यातून जो निष्कर्ष समोर येईल त्या आधारे त्याच्या वापराचा निर्णय घेतला जाईल.
भारतात कोणत्या कंपन्या लहान मुलांच्या लसीवर करत आहे काम?
भारतात सध्या दोन कंपन्या मुलांच्या लसीवर काम करत आहेत. कोव्हॅक्सिन निर्माता भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला ही आणखी एक कंपनी.
डीसीजीआयने भारत बायोटेकला 2 ते 18 वर्षे वयोगटातील लसीच्या फेज 2 आणि 3 चाचणीला परवानगी दिली आहे. सध्या दिल्ली-पाटणा एम्ससह नागपूरमध्येही ही चाचणी सुरू झाली आहे.
या लसीची तयारी मागील वर्षीच सुरू झाली होती, तेव्हा भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा ऐल्ला म्हणाले होते की, ‘आमची लस सुरक्षित आहे, टाइम टेस्टेड आहे आणि तंत्रज्ञानाद्वारे सिद्ध झाली आहे. ही लस 6 महिन्यांच्या बाळापासून कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस दिली जाऊ शकते.’
गेल्या आठवड्यापासून मुलांवर भारत बायोटेकच्या लसीची चाचणी सुरू झाली आहे. कंपनीची योजना तीन वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी घेण्याची आहे. या चाचण्या 12 ते 18 वर्षे, 6 ते 12 वर्षे आणि 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुलांच्या वेगवेगळ्या गटांवर आयोजित केल्या जातील.
Corona पासून लहान मुलांच्या बचावासाठी महाराष्ट्रात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन
नीडल फ्री नोजलने लस देण्याची तयारी
अहमदाबादस्थित झायडस कॅडिलाची ZyCoV-D या लसीची चाचणी देखील 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर केली जात आहे. ही लस नीडल-फ्री इंजेक्शनने दिली जाईल.
यात त्वचेवर नीडल-फ्री नोजलने हाय स्पीड फ्लूड शरीरात पाठविला जाईल. ही लस मुलांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
कंपनीने असा दावा केला आहे की, ही लस सामान्य तापमानातही सुरक्षित राहते. देशाच्या दुर्गम भागातही ती घेऊन जाणं सोपं आहे.
लवकरच झायडस कॅडिला कंपनी आपल्या लसीच्या मंजुरीसाठी डीसीजीआयकडे अर्ज करणार आहे. याशिवाय अमेरिकेत मंजुरी मिळाल्यानंतर फायझरची लस भारतात आणण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
परदेशात कोणती लस कोणत्या टप्प्यावर आहे?
अमेरिकेत, फायझर लसची तीन-टप्प्याची चाचणी 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर केली गेली आहे. या लसीचे दोन डोस 21 दिवसांच्या अंतराने 2200 हून अधिक मुलांना देण्यात आले आहेत. जे 100 टक्के प्रभावी असल्याचे आढळले. यामुळे लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज देखील आढळून आल्या आहेत.
फायझर असा दावा करतात की त्यांची लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी योग्य आहे. जी 2 ते 8 डिग्री तापमानात ठेवणे देखील शक्य आहे.
फायझर कंपनीची भारतात लस पुरवठा करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. ही कंपनी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान 5 कोटी डोस देण्यास तयार आहे.
दुसरीकडे, मुलांसाठी मॉर्डनाच्या लसीच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणीदेखील पूर्ण होणार आहे. यामध्ये 28 दिवसांच्या अंतराने मुलांना दोन लस देण्यात आल्या.
तिसऱ्या टप्प्यात मॉर्डना अमेरिका आणि कॅनडामधील 6750 मुलांची चाचणी घेण्याची तयारी करत आहे. दुसरीकडे, चीनने 3 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी कोरोनाव्हॅक या लसीला मान्यता दिली आहे.
ही लस मुलांसाठी सुरक्षित का आहे?
भारत बायोटेकची कोवाक्सिन मुलांसाठी योग्य का आहे? वेल्लोरचे विषाणूशास्त्रज्ञ टी जेकब जॉन म्हणतात, ‘कोव्हॅक्सिन ही एक इनअॅक्टिवेटेड व्हायरस-आधारित लस आहे.
ही लस त्याच तंत्रज्ञानावर आधारित जी पोलिओ आणि हेपेटायटिस ए लस तयार केली गेली आहे. या प्रकारच्या लसीमुळे रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढत असल्याचं सिद्ध झालं आहे.
तथापि, मुलांवर त्याचा उपयोग करण्यापूर्वी हे ट्रायल डेटासह ते सिद्ध करावं लागेल. त्यानंतरच या लसीला भारतात परवानगी मिळेल.
नागपूर : मेडीट्रीना हॉस्पिटमध्ये होणार लहान मुलांवर लसीची क्लिनीकल ट्रायल
मुलांना लस देणं का महत्वाचे आहे?
आरोग्य तज्ज्ञ तिसरी लाट येण्यापूर्वी मुलांना लस देण्यात यावी यावर भर देत आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, मुलांना लस देणे महत्त्वाचे आहे. लस जरी मुलांना संसर्ग होण्यापासून रोखू शकली नाही तरी देखील कोरोनाची लागण झाल्यानंतर वेगाने बरं होण्यासाठी ही लस अँटीबॉडी म्हणून काम करु शकते.
तिसऱ्या लाटेचे आगमन होईपर्यंत, देशातील बहुतेक प्रौढ लोकांना लस देण्यात आलेली असेल. अशा परिस्थितीत मुलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असेल.
पहिल्या लाटेत संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी फक्त 3 ते 4 टक्के मुलांनाच कोरोनाची लागण झाली होती. तर दुसर्या लाटेमध्ये ही संख्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञ आतापासूनच इशारा देत आहेत की, तिसरी लाट रोखायची असेल तर लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे.
तिसऱ्या लाटेचा मुलांना किती धोका?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुलांमध्ये चांगली प्रतिकारशक्ती असते त्यामुळे कोरोनाचा संसर्ग त्यांना होण्याची शक्यता कमी असते. जर संसर्ग झालाच तर त्यांना लक्षणे देखील सौम्य असतात.
परंतु काही केसेसमध्ये गंभीर संक्रमण झाल्याल मुले इतरांनाही संसर्ग पसरवू शकतात. त्यामुळे लसीकरण हा एकच चांगला मार्ग आहे की ज्यामुळे संसर्ग रोखता येईल.
कोरोनाचे नवे व्हेरिएंट्स आणि म्युटेशन टाळण्यासाठी त्याचा प्रसार थांबविला पाहिजे. देशातील बहुतांश लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी निर्माण करण्यासाठी बहुसंख्य लोकांना लस द्यावी लागेल.
अशा परिस्थितीत मुलांच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला असुरक्षित ठेवता येणार नाही. विशेषतः शाळा सुरू झाल्यास मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.
कोरोनामुळे बाललैंगिक अत्याचार आणि विधवांचं प्रमाण वाढत आहे
मुलांच्या लसींविषयी कोणती चिंता आहे?
सीडीसीसारख्या अमेरिकन संस्था या गोष्टीकडे लक्ष देत आहेत की, लस मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित असावी. त्याचप्रमाणे भारतातही मंजुरीच्या आधी पहिल्या चाचणीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
या लसीचे मुलांवर काही दुष्परिणाम होतात का? हे देखील पहावे लागेल. या लसी प्रौढांप्रमाणेच मुलांना देखील तशाच पद्धतीने लागू पडतात की नाही.
लस घेतल्यानंतर अनेक प्रोढ लोकांना, डोकेदुखी, ताप किंवा अंगदुखी अशा गोष्टी दिसून आल्या आहेत. पण 48 तासात ही लक्षण दूर होत असल्याचंही दिसून आलं आहे. पण लहान मुलं ही लक्षण कितपत सहन करु शकतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसर्या टप्प्यांतील निष्कर्षावर अबलंबून असणार आहे की, मुलांच्या लसीला कधी मंजुरी द्यायची.
ADVERTISEMENT