मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांच्या अभिनंदननाचा प्रस्ताव सभागृहात मांडला गेला तेव्हा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी भाषणं केली. मात्र सर्वात खुमासदार ठरलं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण. बंड कसं झालं? नाकाबंदी चुकवून कसे सुरतला पोहचलो या सगळ्या गोष्टी त्यांनी सभागृहात मनमोकळेपणाने सांगितल्या. एवढंच नाही तर आपल्याला दोनवेळा डावललं कसं गेलं हेदेखील सांगितलं.
ADVERTISEMENT
पहिला किस्सा
भिवंडीच्या एका कार्यक्रमात गडकरीसाहेब आले होते. त्यानंतर मला देवेंद्र फडणवीस मला म्हणाले की तुम्हाला एक चांगली बातमी मिळमार आहे. ती उपमुख्यमंत्रीपदाची होती मला माहित होतं. मी त्यावर काही बोललो नाही. शांत राहिलो. मी दोन-तीनवेळा माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. माझ्या पदाचा, त्यावेळीही माझ्या पाठिशी देवेंद्र फडणवीस उभे राहिले. देवेंद्र फडणवीस मला उपमुख्यमंत्रीपद देणार होते. मात्र त्यावेळीही काहीही निर्णय सेनेने घेतला नाही. मला ते पद द्यावं लागेल म्हणून शिवसेनेने ते पदच घेतलं नाही. असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. हा पहिला प्रसंग सांगितल्यानंतर पुढे त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वेळचाही किस्सा त्यांनी सांगितला.
दुसरा किस्सा
आज आम्ही जो निर्णय घेतला आहे त्याचं कारण मी सांगतो आहे असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महाविकास आघाडी करायची ठरली तेव्हा मला मुख्यमंत्री करणार होते हे वास्तव आहे. सगळ्यांना माहित होतं. मात्र अजित पवारांनी, शरद पवारांनी माझ्या नावाला विरोध केला असं आम्हाला सांगितलं गेलं. मला (उद्धव ठाकरे)ती पदाची जबाबदारी घ्यायला सांगितली आहे हे मला सांगितलं गेलं. मी म्हटलं ठीक आहे. मला पदाची लालसा नाही. मी एका क्षणात त्यांना हो म्हटलं.
या सगळ्यानंतर एकदा अजितदादा सभागृहात बोलत होते. सुधीर जोशी आणि मनोहर जोशी यांच्याबाबतचा किस्सा सुरू होता. त्यावेळी अजितदादा म्हणाले की इथेही अपघातच झाला आहे. मी त्यांना बाजूला घेऊन विचारलं की तुम्ही हे जे वाक्य उच्चारलं त्याचा अर्थ काय? तर ते म्हणाल की आमचा तुमच्या नावाला विरोध असण्याचा काही प्रश्नच नाही. मी सगळं विसरूनही गेलो मला त्या पदाचा मोह कधीच नव्हता.
सत्तेच्या मोहापायी आम्ही उठाव केला नाही. आम्ही निर्णय घेतला यामागचं कारण हेच होतं की जे काही सुरू होतं ते योग्य नाही. आमदारांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला पाहिजे. माझ्याकडे आमदार जे सांगत होते ते म्हणणं मी उद्धव ठाकरेंकडे पाचवेळा मांडलं. पण त्यांनी ते ऐकून घेतलं मात्र निर्णय घेतला नाही. आम्हाला ते पटवून देण्यात अपयश आलं.
माझे वडील जिवंत आहेत, तरीही माझे बाप काढले गेले. माझे वडील खूप कष्ट करून पुढे आले आहेत. आम्हाला कुणी रेडा म्हणालं, कुणी प्रेतं म्हणाले आमचा वाट्टेल तसा अपमान केला. मी माझ्या घरातल्यांना वेळ दिला नाही. मी सगळा वेळ संघटनेला दिला तरीही आमचा अपमान केला गेला. ही खंतही एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली.
ADVERTISEMENT