Covid-19 Vaccine Certificate: लस घेतल्याचं प्रमाणपत्र आता थेट whatsapp वर मिळणार

मुंबई तक

• 12:24 PM • 09 Aug 2021

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर आपलं प्रमाणपत्र हे ऑनलाइन तयार होतं. हे प्रमाणपत्र पुढील अनेक कामांसाठी आपल्याला आवश्यक असणार आहे. त्यामुळे ते डाऊनलोड करुन जपून ठेवणं गरजेचं आहे. आतापर्यंत हे प्रमाणपत्र cowin अॅप किंवा वेबसाइटवरच उपलब्ध होतं. मात्र, यापुढे हे प्रमाणपत्र आपल्याला वेबसाइटवर देखील मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला फक्त पुढील काही गोष्टी करायच्या आहेत. सुरुवातीला आपल्याला […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर आपलं प्रमाणपत्र हे ऑनलाइन तयार होतं. हे प्रमाणपत्र पुढील अनेक कामांसाठी आपल्याला आवश्यक असणार आहे. त्यामुळे ते डाऊनलोड करुन जपून ठेवणं गरजेचं आहे. आतापर्यंत हे प्रमाणपत्र cowin अॅप किंवा वेबसाइटवरच उपलब्ध होतं. मात्र, यापुढे हे प्रमाणपत्र आपल्याला वेबसाइटवर देखील मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला फक्त पुढील काही गोष्टी करायच्या आहेत. सुरुवातीला आपल्याला आपल्या मोबाइलमध्ये 90131 51515 हा फोन नंबर सेव्ह करायचा आहे. हा नंबर केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने नावाने व्हॉट्सअॅपवर तयार केला आहे. हा नंबर सेव्ह केल्यानंतर आपण Whatsapp मध्ये या क्रमांकावर जाऊन फक्त ‘Covid Certificate’ असा मेसेज टाकायचा आहे. त्यानंतर आपण रजिस्ट्रेशनसाठी जो मोबाइल नंबर नोंदवला होता त्यावर आपल्याला एक सहा अंकी ओटीपी येईल जो फक्त 30 सेकंदासाठी लागू असेल.

तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी तुम्ही व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला मेसेजमध्ये तुम्ही कोविनवर रजिस्टर केलेल्या तुमच्या कुटुंबीयांची नावं समोर दिसतील. त्यापैकी तुम्हाला हवा असलेला नंबर तुम्ही निवडायचा आहे.

तुम्ही जो नंबर निवडाल त्या व्यक्तीचं लसीकरण झालेलं प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅपवरच पीडीएफ स्वरुपात मिळेल. ही पीडीएफ फाइल तुम्ही डाऊनलोड करुन सेव्हही करु शकता.

याचवेळी जर आपल्याला तुमच्याशिवाय इतर सदस्याचं देखील प्रमाणपत्र हवं असेल तर Y असा मेसेज करा. जर आपल्याला प्रमाणपत्र नको असेल तर N मेसेज करा.

त्यानंतर तुम्हाला Menu असा देखील मेसेज येईल. जर तुम्ही Menu हा मेसेज टाकला तर तुम्हाला कोविन अॅपमधील जे महत्त्वाचे Menu आहेत ते देखील दिसतील. त्याबाबत जर आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण त्या मेन्यूच्या पुढे असणारा नंबर फक्त मेसेजमध्ये टाकायचा आहे. तर आपल्याला त्यासंबंधी माहिती देखील मिळेल.

    follow whatsapp