न्यू यॉर्क: एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकराची गोळ्या घालून हत्या केली. प्रियकराशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतानाच त्याने आपल्या पत्नीला रंगेहाथ पकडले होते. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून संतप्त झालेल्या पतीने तब्बल तीन गोळ्या झाडून पत्नीच्या प्रियकराची हत्या केली होती.
ADVERTISEMENT
nypost.com च्या रिपोर्टनुसार, आरोपी व्यक्ती 26 वर्षीय असून त्याचं नाव टायलर लामर जेनकिन्स असे आहे. जो अमेरिकन नौसेनेत आहे. जेनकिन्सला आपल्या व्हर्जिनिया येथील घरी पत्नी दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचे जेव्हा आढळून आले तेव्हा संताप अनावर होऊन त्याने पत्नीच्या प्रियकराची गोळ्या झाडून हत्या केली.
पोलिसांनी एका निवेदनात असं म्हटलं आहे की, जेनकिन्सवर 28 वर्षीय टिमोथी पॉल टॅली याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी सेकंड-डिग्री हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. ही घटना शुक्रवारी घडली. तीन गोळ्या लागल्याने टॅलीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जेनकिन्स याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली.
The Virginian-Pilot ने मिळवलेल्या न्यायालयीन कागदपत्रांनुसार, जेनकिन्सच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की जेव्हा तिचा पती खोलीत आला तेव्हा ती टॅलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होती. हे पाहून जेनकिन्सने तिच्या प्रियकरावर थेट गोळीबार केला. जेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन जेनकिन्स अटक केली तेव्हा तो असं म्हणत होता की, ‘मी काय चुकीचं करत आहे?’
दरम्यान, जेनकिन्सने नंतर आपणच टॅलीला तीन गोळ्या मारल्याचे कबूल केले. पत्नीच्या प्रियकराची हत्या करण्यासाठी त्याने वापरलेले पिस्तूल देखील घरातून जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. व्हर्जिनिया-पायलटच्या रिपोर्टनुसार जेनकिन्सला सोमवारी अटक करण्यात आली. तो 2014 पासून यूएस नेव्हीमध्ये सेवा बजावत होता.
दिरासोबत वहिनीचे अनैतिक संबंध, मोठ्या भावाने उचललं भयानक पाऊल
मामी-भाच्याचे अनैतिक संबंध, भाच्याने केली मामाची निर्घृण हत्या
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मामीसोबत आपले अनैतिक संबंध सुरळीत चालू राहावे यासाठीच भाच्याने आपल्या मामाची हत्या केल्याची घटना पटनाच्या दिदरगंज फतेहपूर येथे घडली होती.
फतेहपूर येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस सतत त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. अचानक एके दिवशी दिदारगंज पोलीस ठाण्यात एक व्यक्ती आला आणि मृत व्यक्तीचा फोटो पाहून त्याने पोलिसांना सांगितले की हा त्याचा भाऊ आहे.
त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती आली. मृत व्यक्तीचे नाव सूरज असे आहे. यावेळी पोलिसांनी इतर नातेवाइकांनी या घटनेची माहिती दिली आणि त्यांना चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा काही नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, मृत सूरज हा त्याच्या सासरच्या घरी राहत होता आणि 6 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले की, सूरज हा काही दिवसांपासून खूप अस्वस्थ होता.
पाटणाच्या एसएसपींनी याप्रकरणी विशेष टीम तयार करून तपास सुरू केला होता. त्यानंतर जी माहिती समोर आली ती अत्यंत धक्कादायक अशीच होती. एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान मृत सूरजच्या पत्नीची चौकशी केली असता पोलिसांना तिचा काहीसा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. ज्यानंतर हत्येची संपूर्ण घटना उघडकीस आली.
दरम्यान, नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, चार वर्षांपूर्वी सूरजचा विवाह खानापूर येथील काजलसोबत झाला होता. यादरम्यान दोघांना एक मूलही झाले होते. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण शेजारी राहणारा भाचा अनेकदा मामीला भेटायला यायचा. याच कारणावरून सूरज आणि त्याच्या पत्नीमध्ये सातत्याने भांडण व्हायचं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामा कामाला निघून गेला की, भाचा आपल्या मामीला भेटण्यासाठी यायचा. याचवेळी दोघांमध्ये अनैतिक संबंधही प्रस्थापित झाले होते. बहुतेक वेळा भाचा हा त्याच्या मामीसोबतच असायचा. यादरम्यान, दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान सूरज हा अवैध दारूशी संबंधित एका गुन्ह्यात तुरुंगात गेला. त्यामुळे मामी-भाचा अधिकच जवळ आले होते.
सूरज जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आणि त्याला पत्नीचे आपल्याच भाच्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधांबाबत माहिती मिळाली. याच गोष्टीला सूरजने प्रचंड विरोध केला. जेव्हा हा सगळा प्रकार भाच्याला (आकाश) समजला तेव्हा आकाशने त्याचा मित्र अजित याच्यासोबत मामाच्याच हत्येचा कट रचला.
7 फेब्रुवारी रोजी आकाशने मामा सूरज याला त्याचा मित्र अजित याच्या टेम्पोमध्ये बसवले. यावेळी तिघेही भरपूर दारू प्यायले. यावेळी त्यांनी नियोजनानुसार सूरजला आणखी दारू पाजली. दारू पिऊन सूरज बेशुद्ध झाल्यानंतर आकाशने धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला आणि त्याचा मृतदेह फतेहपूर येथे फेकून दिला. यावेळी पोलिसांनी हत्येत वापरलेला चाकू जप्त केला असून अटक करण्यात आलेल्या आरोपी मामी, भाचा आकाश आणि त्याच्या मित्राची कारागृहात रवानगी केली आहे.
ADVERTISEMENT