इंदूर: इंदूरमध्ये मंगळवारी रंगपंचमी साजरी होत असतानाच दुसरीकडे इंदूरच्या द्वारकापुरी भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका कंत्राटदाराने आधी आपल्या पत्नीचा मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून खून केला आणि नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगपंचमीच्या दिवशी मुले घराबाहेर पडताच ठेकेदाराने हे भयंकर कृत्य केलं. गेल्या अनेक दिवसापासून पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून दोघांमध्ये बऱ्याचदा वाद देखील व्हायचे. त्याचवेळी पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली. त्यात असं लिहंल आहे की,‘मी माझ्या पत्नीची हत्या करून आत्महत्या करत आहे.’त्यामुळे पतीने आधीच पत्नीची हत्या करण्याचं ठरवलं असल्याचं या सुसाइड नोटवरुन स्पष्ट होत आहे.
वास्तविक, रंजीत हा बांधकाम कंत्राटदार होता. रंजीतने पत्नी संतोषी बाई हिचा चार्जर केबलने गळा आवळून खून केला आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, या सगळ्या घटनेच्या वेळी मुलगा सौरभ (वय14 वर्ष) आणि मुलगी निधी (वय 10 वर्ष) ही दोन्ही मुलं रंगपंचमीच्या दिवशी घराबाहेर होळी खेळत होती.
तेव्हाच या सगळा प्रकार घडला. जेव्हा मुलं घरी परतली तेव्हा त्यांना आतील दृश्य पाहून धक्काच बसला. कारण एकीकडे त्यांची आई निपचित अवस्थेत पडली होती तर दुसरीकडे वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे मुलांनी तात्काळ आजूबाजूच्या लोकांना याबाबतची माहिती दिली.
घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही जप्त केली असून आता सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणचा तपासही सुरू केला आहे.
जुन्नर: चारित्र्याच्या संशयावरून 59 वर्षीय पतीने केली 51 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या
धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या तोंडात कोंबली उंदीर मारण्याची पूड
आंतरजातीय विवाह केलेल्या पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याची पूड कोंबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना 23 फेब्रुवारीला अमरावतीतल्या लोणटेक येथे घडली होती. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी राहुल हरिशकुमार शर्मा (35, लोणटेक) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 307 498अ 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, फिर्यादी आणि आरोपीचा आंतरजातीय विवाह झाला आहे. आरोपी हा मद्यपी आहे. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत भांडण करून शिवीगाळ आणि मारहाण करायचा. २३ फेब्रुवारी रोजी आरोपी घरी आला तेव्हा तो मद्याच्या अंमलाखाली होता. त्यावर पत्नीने त्याला तुम्ही बाहेर गेले होते की कामाला, अशी विचारणा केली. त्यावर तू मला विचारणारी कोण? असे म्हणून त्याने तिला मारहाण केली. तिला आपटले. त्यावर मला मारून टाका, अशी ती उद्वेगाने बोलली. तो घरात गेला. आतून उंदीर मारण्याची पुडी आणून ती त्याने पत्नीचे तोंड उघडून तिच्या तोंडात टाकली.
ADVERTISEMENT