केंद्रीय गुन्हे शाखेने (CCB) एका पार्टनर स्विंगर्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून, हे रॅकेट जोडप्यांना आपल्या पार्टनर स्वॅपिंगमध्ये अडकवायचं. यामध्ये आपल्या पार्टनरला इतरांसोबत आणि इतर व्यक्तिसोबत आपण संबंध ठेवण्याचा विचित्र प्रकार केला जातो. याप्रकरणी एका महिलेने पोलिसांत तक्रार केल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या विचित्र खेळात आपल्याला जबरदस्तीने सामील करून घेण्यात आल्याचा आरोप महिलेने केलाय. आपण नकार दिल्यावर काही छायाचित्रांच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्यात आलं असंही या महिलेनं सांगितलं. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Mumbai Airport : थोडं थोडकं नाही तर तब्बल 11 कोटींचा गांजा, दीड कोटींचं सोनं जप्त, कसं लपवलं होतं ते ऐकून थक्क व्हाल
केंद्रीय गुन्हे शाखेने (CCB) हरीश आणि हेमंत नावाच्या दोन आरोपींना बंगळुरूमध्ये अटक केली. हे लोक पार्ट्यांच्या नावाखाली जोडप्यांना पार्टनर स्वॅपिंगमध्ये अडकवत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एका मुलीने तक्रार केली होती की, तिला ओळखीच्या एका व्यक्तीने त्याच्यासोबत आणि त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं होतं. तरुणीने याला विरोध केला असता आरोपीने तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या तक्रारीनंतर केंद्रीय गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, या टोळीकडून अनेक महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. याचाच वापर करुन महिलांचं ब्लॅकमेलिंग केलं जात होतं.
अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की, आरोपी बंगळुरूच्या बाहेरील भागात व्हॉट्सॲप ग्रुप्सद्वारे पार्टी आयोजित करायचे. या पार्ट्यांमधून जोडप्यांना पार्टनर स्वॅपिंगमध्ये फसवलं जायचं. पीडित मुलीने तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपीने तिचा गैरफायदा घेतला. आरोपी तिला आणि इतर महिलांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करायचा. फोटो आणि व्हिडिओ दाखवून धमक्या द्यायचा.
हे ही वाचा >> 21 December 2024 Gold Rate: अहो राव! काय मस्त आहे सोन्याचा भाव; मुंबईसह 'या' शहरांमध्ये सोन्याचे भाव घसरले
याप्रकरणी सध्या हरीश आणि हेमंत नावाच्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला सराईत गुन्हेगार घोषित केलं आहे. दोघांचा यापूर्वीही अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग होता. अशा पार्ट्या करून आरोपींनी यापूर्वीही अनेक महिलांना ब्लॅकमेल केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
आरोपींनी महिलांना अडकवण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी आक्षेपार्ह साहित्याचा वापर केल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, आरोपींनी आणखी किती महिलांना ब्लॅकमेल केलं याचाही शोध घेतला जातोय. पोलिसांनी पुरावा म्हणून व्हिडिओ आणि फोटो ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणातील अन्य संशयीतांचीही चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT