गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झालं आहे. ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या 28 दिवसांपासून त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉ. प्रतित समदानी यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ब्रीचकँडी रूग्णालयाला भेट देऊन मंगेशकर कुटुंबीयांचं सांत्वन केलं. तसंच लता मंगेशकर या आपल्या देशाचा अभिमान आहेत आणि राहतील असंही गडकरी म्हणाले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून लता मंगेशकर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी?
लतादीदींच्या निधनाचं वृत्त ऐकलं, व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. अत्यंत दयाळू स्वभावाच्या, मृदू स्वभावाच्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. येणाऱ्या पिढ्या लता मंगेशकर यांचं एक दिग्गज म्हणून कायमच स्मरण ठेवतील यात माझ्या मनात काहीही शंका नाही. आपल्या मधुर आणि कोमल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज ही त्यांची दैवी देणगी होती. अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर मागच्या 28 दिवसांपासून मुंबईतल्या ब्रीचकँडी रूग्णालयात उपचार सुरू होते. कोरोना आणि निमोनियाशी त्यांनी झुंज दिली. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. प्रतित समदानी हे आणि त्यांची टीम त्यांच्यावर उपचार करत होते.
काय म्हणाले आहेत डॉ. प्रतित समदानी?
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मागील 28 दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना कोरोना झाला होता. तसंच निमोनियाही झाला होता. आज मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं आहे. अत्यंत दुःखद अशीही घटना आहे. त्यांची प्रकृती सुधारावी आणि त्यांना आराम मिळावा म्हणून आम्ही शर्थीचे प्रयत्न करत होतो मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. असं डॉक्टर प्रतित समदानी यांनी स्पष्ट केलं आहे.
चित्रपट संगीत आणि भावगीत या दोन महत्त्वाच्या प्रवाहांना अभिजाततेचं परिमाण देत भारतीय जनमानसावर गेली आठ दशकं अधिराज्य गाजवणारा स्वर आज निमाला. गान कोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्या ९३ वर्षांच्या होत्या. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनावर मात केली होती, मात्र त्रास सुरू झाल्यानं त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला निमोनिया झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांना ब्रीचकॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातच त्यांना कोरोनाचा संसर्गही झाला होता. मात्र, औषधोपचाराच्या मदतीने त्यांनी कोरोनावर मातही केली होती.
ADVERTISEMENT