महाराष्ट्र ATS ची सचिन वाझेंवर नजर,’त्या’ टाटा सुमोचं कोडं उलगडलं

मुस्तफा शेख

• 12:29 PM • 10 Mar 2021

महाराष्ट्र एटीएसची सचिन वाझेंवर नजर होती असं आता स्पष्ट झालं आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे टाटा सुमो. होय सचिन वाझे यांनी एक आरोप आज केला या आरोपामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की टाटा सुमो आपला पाठलाग करते आहे. ही टाटा सुमो महाराष्ट्र एटीएसची असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर एटीएसकडून माझा पाठलाग का […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र एटीएसची सचिन वाझेंवर नजर होती असं आता स्पष्ट झालं आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे टाटा सुमो. होय सचिन वाझे यांनी एक आरोप आज केला या आरोपामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की टाटा सुमो आपला पाठलाग करते आहे. ही टाटा सुमो महाराष्ट्र एटीएसची असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर एटीएसकडून माझा पाठलाग का होत होता हे ठाऊक नाही असं सचिन वाझे यांनी म्हटलं आहे. MH 45 7 W 4887 या क्रमांकाची टाटा सुमो ही सचिन वाझेंचा पाठलाग करत होती असं त्यांनी म्हटलं होतं. ही टाटा सुमो महाराष्ट्र एटीएसची आहे असं आता स्पष्ट झालं आहे.

हे वाचलं का?

फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर सचिन वाझे म्हणतात…

अँटेलिया या मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारीला एक स्कॉर्पिओ उभी होती. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळल्या. या बातमीमुळे खळबळ उडाली होती. ही कार कुणाची होती याची माहिती काढणं सुरू झालं. त्यानंतर ही स्कॉर्पिओ कार ही मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचं समोर आलं. मनसुख हिरेन यांची या प्रकरणी पोलिसांनी चौकशीही केली. मात्र त्यांनी ही कार चोरीला गेली होती असं सांगितलं. या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान सचिन वाझे यांचंही नाव यापुढे समोर आलं, कारण सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांच्या संपर्कात होते असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. तसंच मनसुख हिरेन यांना संरक्षण दिलं पाहिजे अशीही मागणी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी त्यांच्या जबाबात मनसुख हिरेन यांचा खून झाल्याचं म्हटलं तसंच सचिन वाझे यांनी तो खून केला असावा असाही संशय व्यक्त केला. त्यानंतर आता एक टाटा सुमो सचिन वाझे यांचा पाठालग करत होती असं म्हटलं होतं. ही टाटा सुमो एटीएसची असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

    follow whatsapp