-योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्ते पणामुळे ओळखले जातात. विविध विषयांवर ते भाष्य करताना अतिशय बेधडकपणे भूमिका मांडतात. गडकरी पुन्हा एकदा मोठं विधान केलंय. ‘राजकारण केव्हा सोडू आणि केव्हा नाही असं मला वाटतं,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपूर येथील एका खाजगी कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यात आणि देशात सुरू असलेल्या राजकारणाबद्दल नाराजीचा सूर लावला. राजकारण नेमकं आहे काय? राजकारणाचा खरा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. राजकारण समाजासाठी करायला पाहिजे. समाजाच्या विकासासाठी करायला पाहिजे. जुन्या काळात महत्मा गांधींपासून राजकीय परंपरेनं चालत आलं ते राजकारण होतं. पण ते राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकासकारण होतं, असं गडकरी म्हणाले.
सध्याचं राजकारण सत्ताकारणासाठी -गडकरी
“आता आपण जे बघतोय ते शंभर टक्के सत्ताकारण आहे. त्यामुळे राजकारण केव्हा सोडू आणि केव्हा नाही, असं वाटतं,” अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकारणावर बोलताना दिली. “सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रभावी अंग आहे. म्हणून राजकारणात असताना शिक्षण, साहित्य, कला, पर्यावरण यासाठी काम केलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे,” असे आवाहन राजकीय नेत्यांना गडकरींनी केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नागपूर येथे कार्यक्रम आय़ोजित करण्यात आले होते.. यावेळी नितीन गडकरी यांनी आजचं राजकारण आणि राजकीय परिस्थिती यावर भाष्य केलं.
या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे हेही उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी राजकारणातील विविध पैलूवर भाष्य केले. तसेच राजकारणा व्यतरिक्त अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत, असं देखील गडकरी म्हणाले.
ADVERTISEMENT