Pune Metro: ‘तर मी तिथून निघून जाईल’, अजित पवारांनी दिली ताकीद

मुंबई तक

• 02:14 AM • 30 Jul 2021

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कटाक्षाने कोरोना नियमांचे पालन करताना दिसत आहेत. शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मेट्रो ट्रेन ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखविणे आणि त्यांच्या शुभहस्ते पुणे मेट्रो कोच प्रतिकृतीचे अनावरण होणार आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा ठेवण्यात आली आहे. अजित पवार यांनी दिली ताकीद ‘जर […]

Mumbaitak
follow google news

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कटाक्षाने कोरोना नियमांचे पालन करताना दिसत आहेत. शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मेट्रो ट्रेन ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखविणे आणि त्यांच्या शुभहस्ते पुणे मेट्रो कोच प्रतिकृतीचे अनावरण होणार आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा ठेवण्यात आली आहे.

हे वाचलं का?

अजित पवार यांनी दिली ताकीद

‘जर मेट्रो ट्रेन ट्रायल रनला 50 पेक्षा जास्त लोक दिसले तर मी तिथून निघून जाईल.’ अशी ताकीदच अजित पवार यांनी दिली असल्याची माहिती मेट्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी ‘मुंबई तक’ला दिली आहे. माननीय उपमुख्यमंत्री कोरोना नियमांबाहत खूपच गंभीर आहेत. त्यामुळेच त्यांना मेट्रो रेल ट्रायल रनच्या वेळेस गर्दी बिलकुल नको आहे. गेल्याच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते आणि त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाले होते.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि काही कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप ह्यांनी ‘मुंबई तक’ला सांगितले की, ‘अजित दादा नियम कटाक्षानी पाळत आहेत आणि ह्याचे भान सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. सकाळच्या वेळेस येथे गर्दी होणार नाही ह्याची काळजी घेतली जात आहे.’

ह्या आधी ह्याच वर्षी जानेवारी महिन्यात पिंपरी चिंचवड पालिका भवन, म्हणजेच मोरवाड़ी ते फुगेवाडी या 6 किलोमीटर अंतराचे ट्रायल रन यशस्वीपणे घेण्यात आले आणि नंतर जुलै महिन्याच्या सुरवातीला कोथरुड येथे ट्रायल रन झाली होती.

दरम्यान, पुणे शहरात गुरुवारी 304 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर राज्यात कोरोना नव्या रुग्णांची संख्या गुरुवारी 7 हजार 242 इतकी आहे. दिवसभरात राज्यात 190 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.1 टक्के इतका आहे.

गुन्हेगाराला होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का? पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर जेव्हा अजित पवार भडकतात…

यावेळी पुणे जिल्ह्यात 1189, सातारा जिल्ह्यात 1009, अहमदनगर जिल्ह्यात 851, सोलापूर जिल्ह्यात 603, कोल्हापुर जिल्ह्यात 655 आणि सांगली जिल्ह्यात 752 इतके पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यामुळे कोरोनाचे संकट लक्षात घेऊनच अजित पवार ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कोरोनाचे नियम पाळण्याबाबत कठोर ताकीद दिली आहे.

    follow whatsapp