Mumbai Rain : IMD ने मुंबईत जारी केला Red Alert

मुंबई तक

• 10:56 AM • 09 Jun 2021

IMD ने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. पुढचे चार ते पाच दिवस असाच पाऊस कोसळणार आहे. त्या अनुषंगाने हा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला असून पुढचे चार ते पाच […]

Mumbaitak
follow google news

IMD ने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. पुढचे चार ते पाच दिवस असाच पाऊस कोसळणार आहे. त्या अनुषंगाने हा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला असून पुढचे चार ते पाच दिवस हे मुसळधार पावसाचे असणार आहेत हे स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा धोका, जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचे आदेश

आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे. अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चारही दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Monsoon 2021 : महाराष्ट्रासाठी पुढचे ५ दिवस धोक्याचे, IMD कडून अलर्ट जाहीर

कोकण किनारपट्टीवर दाखल झालेल्या मान्सूनने आज मुंबईत धडक दिली. मुंबई शहरात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढचे ५ दिवस धोक्याचे असल्याचं सांगत अलर्ट जाहीर केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच आभाळ दाटून आलेलं पहायला मिळालं. सकाळपासून शहरातील अनेक भागांमध्ये गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून शनिवारी रत्नागिरीच्या हर्णे किनारपट्टी भागात पोहचल्याची हवामान विभागाने दिली आहे. मुंबई महापालिकेनेही हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन शहरात पावसामुळे पाणी साचणार नाही तसेच कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घेतली आहे.

दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा, म्हसळा, माणगाव, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, श्रीवर्धन, तळा या तालुक्यांमधील गावांमध्ये दरड कोसळण्याची भीती आहे. दरड क्षेत्रात येणाऱ्या १०३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान अतिवृष्टीच्या काळात कोणीही समुद्रात जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

    follow whatsapp