बारामतीत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

मुंबई तक

• 07:10 AM • 30 Mar 2021

बारामती: बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोपट विष्णू दराडे असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. दरम्यान, दराडे यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पण घरगुती कलहातून त्यांनी आत्महत्या केली असावी […]

Mumbaitak
follow google news

बारामती: बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोपट विष्णू दराडे असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, दराडे यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पण घरगुती कलहातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, दराडे हे तीन दिवसांपासून खोकल्याने त्रस्त होते त्यामुळे त्यांनी खोकल्याचे औषध समजून चुकून विषारी औषध प्राशन केले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अद्याप याविषयी संपूर्ण माहिती समोर आलेली नाही.

सोलापुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, पतीचा खळबजनक आरोप

सध्या दराडे यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला असून त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकणार आहे. मात्र, बारामती पोलीस सध्या हे याबाबत सर्व बाजूने तपास करत आहे.

RFO दीपाली चव्हाणांची गोळी झाडून आत्महत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वन संरक्षक अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:च्या सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

मेळघाटमधील हरिसाल येथील वनपरिक्षेत्रात असणाऱ्या ३२ वर्षीय दीपाली चव्हाण यांनी आपल्या आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती. दरम्यान, यावेळी दीपाली यांनी आपले वरिष्ठ अधिकारी DCF विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं दीपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये नमूद केलं होतं.

Dipali Chavan: ‘तू पुन्हा लग्न कर पण नोकरीवाली बायको नको करू’, RFO दीपाली चव्हाणांचं शेवटचं पत्र

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये असा आरोप केला होता की, ‘माझ्या आत्महत्येला वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार आणि वन्यजीव विभाग चिखलदरा हेच जबाबदार आहेत.’ या सुसाइड नोटमध्ये विनोद शिवकुमार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

‘विनोद शिवकुमारने मला अत्यंत त्रास दिला आहे. त्यांनी रजा कालावधीतील सुट्टी सुद्धा नाकारली होती. ऑक्टोबर 2020 मध्ये मी प्रेग्नंट असताना मला विनोद शिवकुमार यांनी ट्रॅकिंग करवलं गेलं. त्यामुळे माझा गर्भपात झाला. एवढंच नव्हे तर त्यावेळी देखील मला पुरेशी सुट्टी देण्यात आली नाही. तसंच विनोद शिवकुमार हे मला रात्रीबेरात्री कुठेही भेटण्यासाठी अश्लील भाषेत बोलायचे. यावेळी ते माझे मानसिक आणि आर्थिक नुकसान करत होते.’

‘गर्भपात झाला तरी रजा दिली नाही’, वाचा दीपाली चव्हाणच्या पतीची संपूर्ण मुलाखत

‘अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अनेक लोकांसमोर मला शिवीगाळ केली ज्यायची. अनेकदा शिवकुमारने मला त्यांच्या संकुलात बोलावले होते. ते माझ्या एकटेपणाचा गैरफायदा करत होते. पण मी त्यांच्या मर्जीनुसार न वागल्याने आता ते मला त्याच शिक्षा देत आहेत. मागील आठवड्यापासून शिवकुमार हे माझ्याशी खूप वाईट शब्दात बोलत आहेत. ज्याचा मला मानसिक त्रास होतोय.’ असे आरोप सुसाइड नोटमध्ये करण्यात आले आहेत.

याप्रकरणी तक्रार दाखल होताच अमरावती पोलिसांनी तात्काळ विनोद शिवकुमार यांना अटक केली होती. तसंच प्रशासनाने देखील या घटनेचं गांभीर्य ओळखून शिवकुमार यांना निलंबित केलं आहे.

    follow whatsapp