राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी
ADVERTISEMENT
मशिदीवरील भोंग्यांवरून सध्या राजकिय वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे हे सर्व सुरू असताना याच भोंग्यांच्या एका निर्णयाबाबत चिपळूण नगर परिषद जोरदार चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी चिपळूणमध्ये आलेल्या महापुराने चिपळूण शहर पूर्ण उद्धवस्त झालं होतं. मोठा आर्थिक फटका चिपळूणला बसला होता.
अनेकांची आयुष्यभराची पुंजी या महापुराने हिरावून नेली. या उद्धवस्त चिपळूणला सावरण्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे आले होते. त्यामुळे चिपळूण यातून सावरून पुन्हा उभं राहिलं आहे. आता पावसाळा जवळ येऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीसारखी परिस्थिती उद्भवल्यास काय दक्षता घ्यायची यासाठी प्रशासन स्तरावर खबरदारी घेतली जात आहे. अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. अशाच एका आगळ्यावेगळ्या निर्णयामुळे चिपळूण नगर परिषद चर्चेत आली आहे. एकीकडे मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण सुरू असताना चिपळूण नगर परिषदेने मशिदींवरील भोंग्यांचा वापर चिपळूणमध्ये पुरासारखी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास करण्याचं ठरवलं आहे.
.
यासाठी चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कल्पनेला मुस्लिम समाजाने देखील पाठींबा दिला आहे.
नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याची सर्व माहिती आणि सूचना मशिदीवरच्या भोंग्यांवरून देण्यात येणार आहे. पाण्याच्या पातळीपासून ते नागरिकांना त्या परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीबाबत सुचना मशिदीवरील भोंग्यावरून देण्यात येणार आहेत. चिपळूणातील 30 हून अधिक मशिदींवरून आपत्तीची माहिती देण्यात येणार आाहे.
चिपळूणातील मुस्लिम बांधवांनी या अनोख्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. गेल्यावर्षी महापुराने चिपळूणात अक्षरशः हाहाकार माजवला होता. त्यामुळेच पुराच्या पाण्याबाबतच्या सुचना जनतेला वेळीच मिळण्यासाठी हा अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्यामुळेच सध्या चिपळूण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात आणि देशात मशिदींवरचे भोंगे विरूद्ध हनुमान चालीसा असं राजकारण रंगलं होतं. आता मात्र चिपळूणमध्ये मशिदींवरचे भोंगे वाजणार आहेत. त्याचं कारण सामाजिक आहे.
नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याची सर्व माहिती आणि सूचना मशिदीवरच्या भोंग्यांवरून देण्यात येणार आहे. पाण्याच्या पातळीपासून ते नागरिकांना त्या परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीबाबत सुचना मशिदीवरील भोंग्यावरून देण्यात येणार आहेत. चिपळूणातील 30 हून अधिक मशिदींवरून आपत्तीची माहिती देण्यात येणार आाहे.
ADVERTISEMENT