Maharashtra Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (MahaTransco) इंजिनीअर्ससाठी 4494 जागांवर मेगा भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली), विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली), सहाय्यक अभियंता (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) अशा एकूण 13 जागांसाठी अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहे तसंच लिंकही लवकरच अॅक्टिव्ह होईल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे. (in mahatransco mega recruitment for 4494 seats vacancies govt job opportunity for engineers)
हेही वाचा : Maharashtra live : सुजय विखेंनी चॅलेंज दिलं, निलेश लंकेंनी पूर्ण केलं
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवार,
-
पद क्र.1 : 1) BE/B.Tech (इलेक्ट्रिकल) 2) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे
- पद क्र.2 : 1) BE/B.Tech (इलेक्ट्रिकल) 2) 07 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे
- पद क्र.3 : 1) BE/B.Tech (इलेक्ट्रिकल) 2) पॉवर ट्रान्समिशनचा एकूण 03 वर्षांचा अनुभव
- पद क्र.4 : BE/B.Tech (इलेक्ट्रिकल)
- पद क्र.5 : BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन)
- पद क्र.6 : 1) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार 2) 06 वर्षे अनुभव
- पद क्र.7 : 1) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार 2) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.8 : 1) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार 2) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9 : ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार
- पद क्र.10 : इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी
- पद क्र.11 : 1) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार 2) 06 वर्षे अनुभव
- पद क्र.12 : 1) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार 2) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.13 : 1) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार 2) 02 वर्षे अनुभव
हेही वाचा : Nana Patekar: 'मी दिवसाला 60 सिगारेट प्यायचो', नानांनी सांगितली मुलाच्या मृत्युनंतरची वेदना
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय
-
पद क्र.1 आणि 2 : 18 ते 40 वर्षे
- पद क्र. 3 ते 9 : 18 ते 38 वर्षे
- पद क्र. 10 ते 13 : 57 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Ujjwal Nikam : "निकमांची 'सरकारी वकील' नियुक्ती रद्द करा", प्रकरण कोर्टात
शुल्क
-
पद क्र.1 ते 5 आणि 10 साठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 700 रूपये शुल्क तर, मागासवर्गीय/ अनाथ उमेदवारांकडून 350 रूपये शुल्क आकारले जाईल.
-
पद क्र.6, 7, 8 आणि 11 ते 13 साठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 600 रूपये शुल्क तर, मागासवर्गीय/ अनाथ उमेदवारांकडून 300 रूपये शुल्क आकारले जाईल.
- पद क्र.9 साठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 500 रूपये शुल्क तर, मागासवर्गीय/ अनाथ उमेदवारांकडून 250 रूपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahatransco.in/ वरून माहिती मिळवू शकता. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक लवकरच अॅक्टिव्ह होईल.
ADVERTISEMENT