Mumbai : मुंबईकरांनो, हेल्मेट विसरू नका! मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्तीचं, अन्यथा…

मुंबई तक

• 11:33 AM • 25 May 2022

मुंबईत टू व्हीलरवर प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईत आता दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. मागे बसलेला माणूस म्हणजेच पिलिडियन रायडरलाही हेल्मेट सक्ती करण्यात आलं आहे. मोटरसायकवरून प्रवास करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना हेल्मेट वापरणं बंधनकारक होणार आहे. जर दोन्ही रायडर्सनी हेल्मेट घातलं नसेल तर कारवाई करण्यात येईल. येत्या १५ दिवसांमध्ये ही […]

Mumbaitak
follow google news

मुंबईत टू व्हीलरवर प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईत आता दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. मागे बसलेला माणूस म्हणजेच पिलिडियन रायडरलाही हेल्मेट सक्ती करण्यात आलं आहे. मोटरसायकवरून प्रवास करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना हेल्मेट वापरणं बंधनकारक होणार आहे. जर दोन्ही रायडर्सनी हेल्मेट घातलं नसेल तर कारवाई करण्यात येईल.

हे वाचलं का?

येत्या १५ दिवसांमध्ये ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नव्या नियमाबाबत वाहतूक पोलिसांचं एक परिपरत्रक जारी करण्यात आलं आहे. हेल्मेट न वापरल्यास ५०० रूपये दंड किंना ३ महिने लायसन्स रद्द करण्याची तरतूदही या नव्या नियमाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत बाईकवर बसणाऱ्या दोघांनाही आता हेल्मेट वापरणं बंधनकारक असणार आहे.

बाईक चालवताना चालकासाठी हेल्मेट घालणं अनिवार्य आहे. परंतु अनेक बाईकस्वार हेल्मेट घालताना दिसत नाहीत. मागे बसणारा व्यक्ती तर हेल्मेट घालतचं नाही. पण आता मुंबईत बाईकवर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणं अनिवार्य असणार आहे. अन्यथा दंड भरावा लागेल. येत्या १५ दिवसांत हा नियम लागू होणार आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी हा आदेश काढला असून दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील पुढच्या पंधरा दिवसात हेल्मेट वापरणं बंधनकारक असेल, पुढील पंधरा दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून नियम न पाळणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दुचाकीस्वाराचा ३ महिन्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

    follow whatsapp