नागपुरात तापमानात वाढ झाल्याने बिबट्या आणि अस्वलाच्या पिंजऱ्यात लावण्यात आले कुलर

मुंबई तक

• 07:53 AM • 30 Mar 2022

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर मार्च अजून उलटला नाही तोच सूर्याने आपली प्रखरता दाखवायला सुरुवात केली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण कुलर , एसी लावतो.. आपण घराच्या बाहेर पडत नाही. तिथे प्राण्यांचं काय? नैसर्गिक अधिवासातील प्राणी त्यांच्या सोयीप्रमाणे व्यवस्था करीत असतात. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचा काय ती त्यांना करून द्यावी लागते. ऊन्हाचे चटके बसायला सुरवात झाली आहे. […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

हे वाचलं का?

मार्च अजून उलटला नाही तोच सूर्याने आपली प्रखरता दाखवायला सुरुवात केली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण कुलर , एसी लावतो.. आपण घराच्या बाहेर पडत नाही. तिथे प्राण्यांचं काय? नैसर्गिक अधिवासातील प्राणी त्यांच्या सोयीप्रमाणे व्यवस्था करीत असतात. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचा काय ती त्यांना करून द्यावी लागते. ऊन्हाचे चटके बसायला सुरवात झाली आहे. त्यामुळे नागपूरच्या  महाराजबाग प्राणिसंग्रहालय मध्ये प्राण्यांना उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी कुलर लावण्यात आलेले आहे, त्यासोबतच इतर व्यवस्थाही करण्यात आली आहे .

नागपूर मध्ये सध्या तापमानात कमालीची वाढ  झाली आहे, त्यामुळे सगळ्यांनी  उन्हापासून बचावासाठी थंड पेय पिणे ,उन्हाच्या वेळी घराबाहेर न पडणे सुरू केलं आहे.

मग या जंगलच्या राजाला पण उन्हाचे चटके लागणार , त्यामुळेच या महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील या मोकळ्या जागेत असणारे वाघ आणि वाघीण या त्याच्या आजूबाजूला खेळत आहेत आणि सावली धरून बसले आहेत जेणेकरून उन्हाचे चटके त्यांना लागू नये तर पिंजऱ्यामध्ये हा मात्र सिमेंटच्या असल्यामुळे त्याचं उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून महाराजबाग प्राणिसंग्रहाल कुलर लावले आहे… या प्राणिसंग्रहालय अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाघ आणि बिबटे..या सगळ्यांची देखभाल प्राणी संरक्षण करतात ..पण उन्हात  जरा जास्त काळजी घ्यावी लागते.

नागपुरातील महाराजबाग प्राणी संग्रहालय येथे दरवर्षी उन्हाळा सुरु झाला की प्राण्यांना उन्हाची झळ पोहचू नये म्हणून व्यवस्था केली जाते.. साधारण एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्राण्यांसाठी कुलर, नेट ची सोय केली जाते. यावर्षी मात्र ती पूर्वीच करावी लागतेय कारण उन्हाचे चटके एप्रिल पूर्वीच लागायला सुरुवात झाली.

बिबट्या आणि अस्वलाच्या  पिंजऱ्या बाहेर कुलर लावण्यात आले आहेत, शिवाय दुपारी गरम वाटू नये त्यासाठी पाण्याचा वारंवार शिरकाव पिंजऱ्यात केला जातोय…. सर्वाधिक झळ पक्षांना पोहोचते त्यांना गरम  हवेची झळ पोहोचू नये म्हणून संपूर्ण पिंजरा ग्रीन नेट लावून कव्हर केलं आहे….उन्हाळ्याच्या दिवसात यांच्या कडे बारीक लक्ष ठेवावे लागते कारण शरीराचं तापमान कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम या प्राण्यांच्या प्रकृतीवर होण्याची शक्यता अधिक असते.

उष्ण वारे आणि सूर्यकिरणांनी नागपूरकरांचा त्रास वाढला आहे. सध्या राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्ण लहरींची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत उष्ण वाऱ्यांचे चटके बसण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात तापमान 45 अंश पर्यंत जाण्याची शक्यता नागपूर हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. हे संपूर्ण महाराजबाग प्रशासन प्रत्येक ऋतूत या सगळ्या प्राण्यांची त्या त्या वेळेनुसार व्यवस्थ करत असते. त्यामुळे नागपुरातील भीषण गर्मीत देखील थंडा थंडा कुल कुल चा आनंद हे वाघ बिबटे घेताना दिसत आहेत.

    follow whatsapp