सातारा: सुरुवातीला आपल्या पत्नीला (Wife) आणि नंतर आपल्या प्रेयसीची (Girlfriend) अतिशय थंड डोक्याने हत्या (Murder) करणाऱ्या साताऱ्यातील नराधमाने आता हत्येमागचं नेमकं कारण सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
एखाद्या हत्या प्रकरणात मारेकऱ्याची मानसिकता महत्वपूर्ण असते. सातारा जिल्ह्यातील सीरियल किलर (Serial Killer) संतोष पोळ याने केलेले खून आजही अनाकलनीय आहे. असं असताना आता पाच वर्षानंतर क्रूरकर्मा नितीन गोळे याची मोडस ऑपरेंडी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.
याबाबत त्याने पोलिसांना एकच सांगितलं की,‘पाय घसरला की खेळ खल्लास’ दोन्ही हत्यांच्या मागे हेच कारण असून वाई तालुक्यातील अन्य दोन ‘मिसिंग केस’शी देखील नितीनचा संबंध आहे का? हे शोधण्यात प्रयत्न तपास अधिकारी आशिष कांबळे आणि त्यांच्या टीमने सुरु केला आहे.
बायकोसह प्रेयसीचा खून केल्यानंतरही नितीन हा अतिशय सामान्यपणे वावरत होता. दरम्यान, त्याचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर आता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी सुरु केली आहे.
त्यानुसार आता पोलिसांनी ग्रामस्थांसह काही संस्थांच्या मदतीने नितीनच्या पत्नीचा 30 फूट खोल दरीत उत्खनन करुन मृतदेहाचा शोध सुरू आहे. यावेळी पोलिसांना बांगड्या, स्वेटर, हाडे, साडी अशा गोष्टी पोलिसांना सापडल्या आहेत.
क्रूरकर्म्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही
दोन खून करून सुद्धा कसलाही पश्चाताप संशयित आरोपीच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तर गुरूवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस घटनास्थळी नेऊन संशयित आरोपी नितीन याची पोलिसांनी बराच वेळ चौकशी केली. त्यामुळे या प्रकरणी आणखी काही हाती लागण्याची चिन्हे आहेत.
मिसिंगचा फिर्यादी ते संशयित आरोपी नितीन याचा वाई पोलीस कसा तपास करतात यावर अनेक गुन्ह्यांची उकल लपलेली आहे अशी चर्चा वाई तालुक्यात सध्या सुरु आहे.
सीरियल किलरमुळे वाई तालुका पुन्हा हादरला
लष्करातील नोकरी सोडून परत आलेल्या नितीन गोळे याने प्रेयसीसह बायकोला देखील संपवले. याच प्रकरणाचा तपास केल्यानंतर त्याने पोलिसांनी असं सांगितलं की, ‘पाय घसरला की खेळ खल्लास.’
लष्कराची नोकरी सोडून आलेल्या नितीनचे लग्न मनिषाबरोबर ठरलं होतं. लग्नानंतर नितीन आणि मनिषाने सुरुवातीलाच आपला संसार कोल्हापुरात थाटला होता. त्यावेळी ते दोघेही नोकरीला होते.
परंतु याचदरम्यान मनिषा आणि अन्य एका व्यक्तीचे सूत जुळले होते. त्यावेळी नितीनला याची सुतराम कल्पना नव्हती. त्यांचा संसार काही वर्षे सुखाने चालला. मात्र काही वर्षात नितीनला तिच्या चारित्र्याविषयी संशय येऊ लागला. आपल्या बायकोचे कोल्हापुरात दुसऱ्या व्यक्तीशी अनैतिक संबंध आहेत ही मानसिकता ठाम झाल्यामुळे त्यानं काही दिवसातच मनिषाला तिचा व्याहळी ओढा येथे नेऊन तिची निर्घृण हत्या केली.
बायकोची हत्या केल्यानंतर नितीनने अतिशय थंडपणे नव्या जीवनाला सुरुवात केली. अडीच एकर शेतीबरोबरच साताऱ्यात छोटीमोठी कामं करताना त्याची संध्या या एका महिलेसोबत ओळख झाली.
संध्या शिंदे आणि नितीन यांच्यात अनैतिक संबंध देखील सुरु झाले. संध्याचा पती व्यसनी असल्याचे त्याला माहितच होते. त्यामुळेच त्या दोघांचे सूत जुळले होते. मात्र, त्याचवेळी त्याला अशीही माहिती मिळाली की, संध्या हिचे तिच्या पतीचा मुंबईत असणाऱ्या एका मित्रासोबत देखील संबंध आहेत.
बायकोच्या अनैतिक संबंध असल्यानेच त्याने तिची हत्या केली होती. आता आपल्या विवाहित प्रेयसीचे आपल्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीशीही अनैतिक संबंध असल्याचे समजल्याने त्याने प्रेयसी संध्या शिंदे हिला देखील व्याहळीच्या रानात नेऊन तिची गळा दाबून हत्या केली. या प्रकरणाचा देखील आता पोलीस तपास करत आहेत.
Crime: गुपचूप घरात शिरुन धारदार शस्त्राने वार, मित्राच्या बायकोची अवघ्या काही क्षणात निर्घृण हत्या
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या डॉ. संतोष पोळ हत्याकांडाची पुनरावृत्ती वाई तालुक्यात झाली असून पत्नीसह प्रेयसीचा खून करणाऱ्या क्रूरकर्मा नितीनची सध्या कसून तपासणी सुरू आहे. पत्नीचा मृतदेह पुरून ठेवलेल्या ओढय़ात शुक्रवारी दिवसभर खोदकाम सुरू होते.
यावेळी मृत मनिषाची साडी, स्वेटर व बांगड्या तसेच मृतदेहाचे काही अवशेष सापडले आहेत. भुईंज पोलीस व सह्याद्री टेकर्सच्या माध्यमातून सुरू असलेले शोधकार्य अद्यापही सुरूच आहे. अशी माहिती भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT